सोलापूर विधानपरिषद : गोरे म्हणाले विरोधकांकडे 16 मतंही नाहीत, आता धैर्यशील मोहितेंचं जोरदार प्रत्युत्तर
Dhairyasheel Mohite Patil on Jaykumar Gore : विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सोलापुरात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विरोधकांची खिल्ली उडवल्यानंतर आता खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सोलापूर विधानपरिषद : गोरे म्हणाले विरोधकांकडे 16 मतंही नाहीत
आता धैर्यशील मोहितेंचं जोरदार प्रत्युत्तर
Dhairyasheel Mohite Patil on Jaykumar Gore, सोलापूर : सोलापूर विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना मैदानात उतरवलंय. तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते वसंत देशमुख यांनी शड्डू ठोकलाय. विशेष म्हणजे काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानंतर महाविकास आघाडीने वसंत देशमुख यांचा अधिकृत उमेदवार म्हणून स्वीकार केलाय. दरम्यान, भाजपचं बिनविरोधचं स्वप्न भंगल्यानंतर पालकमंत्री आणि भाजप नेते जयकुमार गोरे यांनी प्रतिक्रिया दिली होती. "ज्यांच्याकडे 616 पैकी 16 मतंही नाहीत, त्यांच्या लढाई व्हायचं कारण नाही", असं गोरे म्हणाले होते. आता गोरेंच्या या टीकेला खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय. जयकुमार गोरे काय म्हणाले होते? आणि मोहितेंनी त्यांना काय प्रत्युत्तर दिलंय? जाणून घेऊयात...
हेही वाचा : छत्रपती संभाजीनगर : पोह्यात मीठ जास्त पडल्याचं सांगितलं, अन्..भयंकर घडलं!
त्यांच्याकडे 616 पैकी 16 मतंही नाहीत - जयकुमार गोरे
जयकुमार गोरे म्हणाले होते की, निवडणूक लागलेली आहे. विरोधासाठी विरोध म्हणून उभे असले तरी भाजप ही निवडणूक गांभीर्याने लढेल. ही निवडणूक भाजपची जिंकेन. फक्त औपचारिकता बाकी आहे. आम्हाला अपेक्षित मताधिक्यांनी आम्ही जिंकू.. बिनविरोध करण्यासाठी काही लोकांशी संपर्क झाला नाही. किंवा त्यांच्याशी मला संपर्क करु वाटला नाही. इथं झारीतला शुक्राचार्य कोणी नाही. निवडणूक वसंत देशमुख लढत आहेत. त्यांच्यामागे कोण आहे, त्यांची ताकद राहिलेली नाही. त्यामुळे त्यांच्या पाठिमागे किंवा पुढे कोण आहे? हे बघायचं कार नाही. लोकशाहीमध्ये विरोधक उभा राहिल्यानंतर त्याला कमी समजायचं कारण नाही. आम्ही निवडणूक गांभार्याने लढू. ज्यांच्याकडे 616 पैकी 16 मतंही नाहीत, अशा लोकांशी लढाई व्हायचं कारण नाही. ही लढाई औपचारिकता आहे. आम्ही ती औपचारिकता पूर्ण करु. सगळ्या अदृश्य शक्तींवर माझं लक्ष आहे. त्यांच्यावर लक्ष ठेऊन आम्ही करु, असंही गोरे यांनी नमूद केलं.
हेही वाचा : ऑफिसमध्येच मर्डर, सहकाऱ्याने क्रूरपणे संपवलं; निष्पाप तरुणीसोबत काय घडलं?









