मद्य घोटाळाप्रकरणी केजरीवालांची निर्दोष मुक्तता, निकालानंतर अश्रूंचा बांध फुटला; मोदी आणि शहांबद्दल काय म्हणाले?

मुंबई तक

Arvind Kejriwal : दिल्लीच्या मद्य धोरणाशी संबंधित कथित घोटाळ्याच्या प्रकरणात राऊज अव्हेन्यू न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे.  दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची सर्व आरोपांतून मुक्तता केली आहे. सबळ पुराव्याअभावी केवळ आरोपांच्या आधारे कोणालाही दोषी ठरवता येत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या निकालानंतर अरविंद केजरीवाल भावुक झाले असून, त्यांनी हा सत्याचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

ADVERTISEMENT

Arvind Kejriwal
Arvind Kejriwal
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मद्य घोटाळाप्रकरणी केजरीवालांची निर्दोष मुक्तता

point

निकालानंतर अश्रूंचा बांध फुटला

point

मोदी आणि शहांबद्दल काय म्हणाले?

Arvind Kejriwal : दिल्लीच्या मद्य धोरणाशी संबंधित कथित घोटाळ्याच्या प्रकरणात राऊज अव्हेन्यू न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे.  दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची सर्व आरोपांतून मुक्तता केली आहे. सबळ पुराव्याअभावी केवळ आरोपांच्या आधारे कोणालाही दोषी ठरवता येत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या निकालानंतर अरविंद केजरीवाल भावुक झाले असून, त्यांनी हा सत्याचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : 27 फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो मराठी भाषा गौरव दिन? कधीपासून झाली सुरूवात? जाणूया इतिहास आणि महत्त्व

सीबीआयच्या आरोपपत्रावर गंभीर ताशेरे

न्यायालयाने आपल्या निकालात सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रावर गंभीर ताशेरे ओढले. आरोपपत्रात अनेक त्रुटी असून तपास यंत्रणेने मांडलेले पुरावे कमकुवत आणि अपुरे असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. एखाद्या घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीवर गंभीर आरोप करताना ठोस पुरावे असणे अनिवार्य आहे, अशी टिप्पणीही न्यायालयाने केली. या प्रकरणात सर्वात आधी उत्पादन शुल्क विभागाचे माजी आयुक्त कुलदीप सिंह यांची मुक्तता करण्यात आली आणि त्यानंतर केजरीवाल व सिसोदिया यांनाही क्लीन चिट देण्यात आली.

स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे राजकीय षडयंत्र

न्यायालयाच्या निर्णयानंतर पत्रकारांशी संवाद साधताना अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी मिळून 'आप'ला संपवण्यासाठी स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे राजकीय षडयंत्र रचले होते,' असा आरोप त्यांनी केला. केवळ प्रतिमा मलीन करण्यासाठी आपल्याला सहा महिने आणि सिसोदिया यांना दोन वर्षे तुरुंगात ठेवले गेले, मात्र अखेर संविधानाचा आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा विजय झाला, असेही त्यांनी नमूद केले.

हे वाचलं का?

    follow whatsapp