नागपूर : 8 वर्षांच्या लेकीला बाप दाखवायचा पोर्न, नंतर नको तेच... कोणाला सांगितल्यास द्यायचा 'ती' धमकी

योगेश पांडे

Nagpur Crime : नागपूरमध्ये एका वकील वडिलांवर अश्लील व्हिडिओ दाखवून 8 वर्षांच्या दिव्यांग मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे आणि अटक केली आहे. ही घटना नागपूरमधील मानकापूर पोलीस ठाण्याअंतर्गत घडली. तसेच ज्या मुलीसोबत असे हैवानी कृत्य केले ती मुलगी मासिकदृष्ट्या दिव्यांग आहे. 

ADVERTISEMENT

Nagpur Crime
Nagpur Crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वडील मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवून करायचा नको तेच...

point

मुलीला गायब करण्याची दिली धमकी

Nagpur Crime : नागपूरमध्ये एका वकील वडिलांवर अश्लील व्हिडिओ दाखवून 8 वर्षांच्या दिव्यांग मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला करत अटक केली आहे. ही घटना नागपूरमधील मानकापूर पोलीस ठाण्याअंतर्गत घडली. तसेच ज्या मुलीसोबत असे हैवानी कृत्य केले ती मुलगी मासिकदृष्ट्या विकलांग आहे. 

हे ही वाचा : 'अजितदादांच्या अपघातात काहीतरी काळंबेरं...' राज ठाकरेंच्या मनात संशयाची पाल?

वडील मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवून करायचा नको तेच...

वकील वडील आणि त्यांची पत्नी हे वेगळे राहत होते. कौटुंबिक कलहामुळे मुलगी ही तिच्या वडिलांसोबत राहत होती. या प्रकरणी मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, त्या तक्रारीत तिच्या आईने पीडितेवर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला. पती तिला अश्लील व्हिडिओ दाखवून अनुचित वर्तन करायचा. यानंतर पत्नीने शिवीगाळ करत धमक्या देण्यास सुरुवात केली. 

याबाबत सांगितल्यास मुलीला गायब करण्याची दिली धमकी

या घटनेची माहिती पत्नीने तिच्या 70 वर्षीय सासऱ्यांना सांगितली, ते म्हणाले की, तेव्हा सासरा म्हणाला की, 'ती त्याची मुलगी आहे तो काहीही करेल'. तिने याबाबत जर कोणाला काही सांगितल्यास मुलीला गायब करेन अशी धमकी दिली होती. 

हे ही वाचा : बुलढाणा : मित्राच्या मदतीने भावाला संपवलं, पुरावा नष्ट करण्यासाठी शेतात जाळला मृतदेह

व्यथित झालेल्या महिलेनं पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. संबंधित प्रकरण हे अत्यंत गंभीर असून पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी दिव्यांग आणि मतिमंद मुलांसाठी शिक्षक आणि तज्ज्ञांची मदत घेतली होती. त्यानंतर चौकशी करून मुलीने लैंगिक अत्याचाराची पुष्टी केली. याआधारे पोलिसांनी वकील आणि तिच्या वडिलांविरुद्ध लैंगिक अत्याचार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणात वकील वडिलांना अटक केली. 

हे वाचलं का?

    follow whatsapp