'अजितदादांच्या अपघातात काहीतरी काळंबेरं...' राज ठाकरेंच्या मनात संशयाची पाल?

मुंबई तक

Raj Thackeray : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज 27 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेत अजितदादांच्या अपघाताबाबत संशय व्यक्त केले आहेत. 'अजितदादांचा एफआरआय लिहून दिला नाही, हा जर घातपात असेल तर एफआरआय का दाखल करून घेतला जात नाही? त्यांच्याच कुटुंबीयांना जर एफआरआय दाखल करायचा आहे, पण यासाठी अडथळे का आणले जात आहेत? सुनेत्राताई या सरकारमध्ये आहेत त्यांनी याचा विचार करावा, अजितदादा हे त्यांचे पती होते आणि त्यांच्याच पतीच्या अपघाताबाबतचा एफआरआय दाखल केला आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

ADVERTISEMENT

Raj Thackeray
Raj Thackeray
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राज ठाकरेंची पत्रकार परिषद

point

राज ठाकरे यांनी अजितदादांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केले

Raj Thackeray : शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक पत्रकार परिषद घेत अजितददांच्या मृत्यूबाबत अनेक संशय व्यक्त केले. त्यांनी अजितदादांच्या निधनाबाबत एफआयआर दाखल करण्याची देखील मागणी केली होती. याचप्रकरणी आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज 27 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेत काही संशय व्यक्त केले आहेत. 'अजितदादांचा एफआयआर लिहून दिला नाही, हा जर घातपात असेल तर एफआयआर का दाखल केला नाही? त्यांच्याच कुटुंबीयांना जर एफआयआर दाखल करायचा आहे, पण यासाठी अडथळे का आणले जात आहेत? सुनेत्राताई या सरकारमध्ये आहेत त्यांनी याचा विचार करावा, अजितदादा हे त्यांचे पती होते आणि त्यांच्याच पतीच्या अपघाताबाबतचा एफआरआय दाखल केला आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

  हे ही वाचा : 'मी नक्कीच दादांबरोबर...' अजित पवारांसाठी मनसे मैदानात उतरणार? राज ठाकरे आणि रोहित पवार यांच्या भेटीत काय घडलं?

त्या ब्लॅकबॉक्सचं पुढं काय झालं?

'एफआयआर प्रकरण सरकारने याची उत्तरे देणे गरजेचे आहे. त्या ब्लॅकबॉक्सचं पुढं काय झालं याचं मला माहिती नाही. विमानाचे नुकसान जरी झाले असले तरीही ब्लॅकबॉक्सचे नुकसान होत नाही, पण त्याचे काय झाले याचे अद्यापही काहीही माहिती नाही. सरकार संशयाची भूतं नाचवत आहेत, यामागील नेमकं राजकारण माहिती नाही. माझं म्हणणं असं की, एफआयआर नोंदवून का घेतला जात नाही? तो नोंदवला जावू नये यासाठी सरकार का प्रयत्न करत आहे, याची सरकारने उत्तरे द्यावीत', असं राज ठाकरे म्हणाले. 

 हे ही वाचा : बुलढाणा : मित्राच्या मदतीने भावाला संपवलं, पुरावा नष्ट करण्यासाठी शेतात जाळला मृतदेह

'एफआयआर का नोंदवत नाही याचं सरकारनेच उत्तर द्यावं'

'एकदा एफआयआर नोंदवल्यानंतर त्यानुसार चौकशी व्हावी एवढीच अपेक्षा आहे. सरकार एफआयआर का नोंदवत नाही याचं सरकारनेच उत्तर द्यावं. तीन-तीन ठिकाणी एफआयआर नोंदवूनही एफआरआय घेतले जात नसतील तर हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे. हा संपूर्ण राजकारणाच्या पलिकडचा विषय आहे. असा अपघात कोणाचाच होऊ नये. जर काही त्रूटी असतील तर त्याची चौकशी व्हावी, पण एफआयआर नोंदवला जात नसेल तर आपला महाराष्ट्र एका वेगळ्याच भलत्या ठिकाणी घेऊन चाललोय', असं राज ठाकरे म्हणाले. 

हे वाचलं का?

    follow whatsapp