'धनंजय मुंडेंच्या केसाला जरी धक्का लागला तर...', मनोज जरांगे आणि सुरेश धस यांना कोणी दिली धमकी?
Dhananjay Munde supporter threatened Manoj Jarange Patil and Suresh Dhas : जरांगे यांच्या या आरोपानंतर धनंजय मुंडे यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. गोविंद फड यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले की, "धनंजय मुंडे यांच्या केसाला पण धक्का लागला तर मनोज जरांगे आणि आमदार सुरेश धस यांचा खेळ खल्लास."
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'धनंजय मुंडेंच्या केसाला जरी धक्का लागला तर...'
मनोज जरांगे आणि सुरेश धस यांना कोणी दिली धमकी?
Dhananjay Munde supporter threatened Manoj Jarange Patil and Suresh Dhas ,बीड : बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे खळबळ उडाली आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे परळीतील समर्थक गोविंद फड यांनी फेसबुकवर एक वादग्रस्त पोस्ट केली असून, यामध्ये त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि आमदार सुरेश धस यांना थेट धमकीवजा इशारा दिला आहे. "धनंजय मुंडे यांच्या केसाला जरी धक्का लागला, तर खेळ खल्लास..मनोज जरांगे आणि सुरेश धस," अशा आशयाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
वादाची ठिणगी आणि पार्श्वभूमी
या वादाची मुळे बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आहेत. या प्रकरणाच्या चौकशीनंतर धनंजय मुंडे यांना मंत्रीपद गमवावे लागले होते, तर वाल्मीक कराड यांना तुरुंगात जावे लागले होते. या प्रकरणात संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी मनोज जरांगे पाटील आणि आमदार सुरेश धस यांनी सातत्याने आग्रही भूमिका मांडली होती.
हेही वाचा : "राजआश्रय… कुणाला? आम्हा / तुम्हा",वाल्मिक कराडच्या मुलाची आणखी एक खळबळ उडवणारी पोस्ट
मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. "माझ्या हत्येचा कट रचला जात असून, धनंजय मुंडे वारंवार माझ्या विरोधात षडयंत्र रचत आहेत. मंत्रालयात यासाठी बैठका घेतल्या जात आहेत. मुंडे यांनी हे थांबवावे, अन्यथा त्यांना हे जड जाईल," असा इशारा जरांगे यांनी दिला होता.










