समजून घ्या: ऑफिसमध्ये लैंगिक शोषण झालं तर नेमकं काय करायचं?

अनुजा धाक्रस

कामाच्या ठिकाणी महिलांवरील होणारे लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी Prevention of Women from Sexual Harassment Act, 2013 म्हणजेच POSH कायदा हा अस्तित्वात आला. समजून घ्या नेमका हा कायदा आहे तरी काय?

ADVERTISEMENT

samjun ghya anuja dhakras what exactly should you do if sexual harassment occurs in office
समजून घ्या
google news

नाशिकमधल्या TCS कंपनीत ९ महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतरण करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकार एखाद्या वेळेस आणि हल्लीच घडलाय असंही नाही तर २०२२ पासून म्हणजेच जवळपास ४ वर्षांपासून सुरू असल्याचं पीडितांचं म्हणणं आहे. कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण किंवा धर्मांतरण करण्याचे प्रकार घडत असतील तर अशा वेळी नेमकं काय करावं ह्याबाबत अनेकांना माहितीच नसते, काही जण सहकाऱ्यांना सांगतात पण कारवाईचे अधिकार ज्यांच्याकडे आहेत त्यांच्यापर्यंत हे प्रकरण नेतच नाहीत आणि काही जण अक्षरश: घाबरतात. 

याचबाबत आपण समजून घेऊ की अशा वेळी नेमकं काय करायचं आणि कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषणाबाबत कायदे नेमके काय आहेत? 

कामाच्या ठिकाणी महिलांवरील होणारे लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी Prevention of Women from Sexual Harassment Act, 2013 म्हणजेच POSH कायदा आला. राजस्थानमधील एका सरकारी महिलेने बालविवाहाच्या विरोधात आवाज उठवला म्हणून तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला, ही केस पुढे सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचली तेव्हा कोर्टाने या मुद्द्यावर प्रकाश टाकला की अस्तित्वात असलेले कायदे हे महिलांचं कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषणापासून संरक्षण करण्यासाठी पुरेसे नाहीत. कोर्टाने विशाखा गाईडलाईन्स आखून दिल्या आणि त्याच धर्तीवर संसदेने 2013 मध्ये Prevention of Women from Sexual Harassment Act, 2013 मंजूर केला. 

आता ह्यानुसार लैंगिक शोषण झाल्यास काय कारवाई होते, कशी होते हे समजून घेऊया पण त्याचसोबत लैंगिक शोषण अंतर्गत नेमकं काय-काय येतं हे समजून घेणं गरजेचं आहे. 

हे वाचलं का?