आमदार गोपीचंद पडळकरांना मोठा झटका, महायुतीच्या मनसुब्यांनाही सुरुंग
Gopichand Padalkar : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आमदार गोपीचंद पडळकर यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला. या निर्णयाविरोधात ते सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आमदार गोपीचंद पडळकरांना मोठा झटका
महायुतीच्या मनसुब्यांनाही सुरुंग
Gopichand Padalkar , सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना मोठा धक्का बसला आहे. जत सोसायटी गटातून त्यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज कोल्हापूर खंडपीठाने अवैध ठरवला आहे. या निर्णयामुळे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पडळकर यांच्या उमेदवारीचा मार्ग अडला आहे. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय आमदार पडळकर यांनी घेतला आहे. त्यानुसार ते सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणातील पुढील घडामोडींकडे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : तुळजाभवानी मंदिरात पोलिसांचा राडा! मंदिर संस्थानच्या सुरक्षा रक्षकाचं डोकं फोडलं VIDEO
जतचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी जत सोसायटी गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांच्या उमेदवारी अर्जावर जतचे माजी आमदार विक्रम सावंत यांनी हरकत घेतली होती. या प्रकरणी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुजय शिंदे आणि माजी आमदार विक्रम सावंत यांनी कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. पडळकर यांनी केलेली जमीन खरेदी आणि त्यानंतर मिळवलेले सोसायटीचे सभासदत्व यावर याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतला होता. सोसायटीचे सभासदत्व दोन वर्षांपूर्वीचे नसल्याचा मुद्दा त्यांनी न्यायालयासमोर मांडला होता. त्यामुळे पडळकर यांच्या उमेदवारी अर्जाच्या वैधतेचा प्रश्न उपस्थित झाला होता.
हेही वाचा : सौरव दास अन् आशितोष रांका पुन्हा पोलिसांच्या ताब्यात, गेटवर चढून जंतर-मंतरवर आले पण...
