ठाकरेंच्या शिवसेनेतून सर्वात मोठी बातमी, आदित्य ठाकरेंना 'कार्याध्यक्ष' करण्यात येणार?

ऋत्विक भालेकर

Aditya Thackeray : ठाकरेंच्या शिवसेनेत मोठे संघटनात्मक बदल होण्याची शक्यता असून आगामी जून महिन्यात आदित्य ठाकरे यांच्याकडे 'कार्याध्यक्ष' पदाची धुरा सोपवण्यात येणार असल्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

Aditya Thackeray
Aditya Thackeray
google news

बातम्या हायलाइट

point

ठाकरेंच्या शिवसेनेतून सर्वात मोठी बातमी

point

आदित्य ठाकरेंना 'कार्याध्यक्ष' करण्यात येणार?

Aditya Thackeray and Shivsena Thackeray Group :  ठाकरे गटाच्या शिवसेनेत आगामी काळात मोठे संघटनात्मक फेरबदल होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. पक्षाचा म्हणजेच शिवसेनेचा वर्धापन दिन जून महिन्यात साजरा होणार असून, या विशेष मुहूर्तावर आमदार आदित्य ठाकरे यांना 'कार्याध्यक्ष' करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव मांडला जाण्याची चिन्हे आहेत. ही संभाव्य नियुक्ती राजकीयदृष्ट्या अत्यंत विशेष मानली जात आहे. कारण 2003 मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी दिली होती. आता त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता असून आदित्य ठाकरे यांच्याकडे ही मोठी जबाबदारी सोपवून पक्ष संघटनेत मजबूत करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती आहे. या निर्णयामुळे पक्षबांधणीला अधिकृत वेग मिळण्याची अपेक्षा आहे.

शिंदे गटाचे आव्हान आणि ठाकरे गटातील अस्वस्थता

राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सध्या राज्यभर मोठ्या प्रमाणात दौरे सुरू केले आहेत. त्यांनी नुकताच मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करून सोलापूर, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगरसह जालना अशा लोकसभानिहाय मतदारसंघांचा सविस्तर आढावा घेतला आहे. श्रीकांत शिंदे यांच्या या वेगवान हालचाली आणि विस्तार रणनीतीमुळे ठाकरे गटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे स्वतः प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करत नसल्याची तक्रार पक्षातील काही खासदार आणि महत्त्वाच्या नेत्यांकडून सातत्याने होत आहे. शिंदे गटाच्या या विस्तारवादी भूमिकेला रोखण्यासाठी आता ठाकरे गट सावध झाला असून नवीन व्यूहरचना आखत आहे.

हेही वाचा : TCS Scandal: देशाला हादरवून टाकणारे खुलासे, नाशिकमधील अंडरकव्हर ऑपरेशन... महिलांसोबत नेमकं घडलं तरी काय?

2029 च्या निवडणुकांसाठी ठाकरे गट नवी टीम करणार तयार? 

शिंदे गटाच्या विस्तार रणनीतीला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्या संघटनात्मक अधिकारांमध्ये मोठी वाढ करण्याचे नियोजन पक्षाच्या वतीने केले जात आहे. त्यांना केवळ युवासेना प्रमुख म्हणून मर्यादित न ठेवता, संपूर्ण राज्यात सक्रिय करण्याची रणनीती ठाकरे गटाकडून आखली जात आहे. पक्षातील वरिष्ठ सूत्रांच्या मते, जर आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाली, तर त्यांना अधिकृतपणे पक्ष बांधणीत मोठे निर्णय घेण्याचे अधिकार प्राप्त होतील. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होऊन प्रत्यक्ष मैदानावरील कामाला गती मिळेल. विरोधकांच्या आव्हानांचा समर्थपणे सामना करण्यासाठी आदित्य ठाकरेंची ही संभाव्य पदोन्नती महत्त्वाची ठरणार आहे.

हे वाचलं का?