समजून घ्या: बकऱ्याची कुर्बानी, नमाज.. पण मुस्लिम देशांमध्ये काय आहेत नियम?
Kurbani eid 2026: बकरी ईद निमित्त दिली जाणारी कुर्बानी यावरून सध्या बरंच राजकारण सुरू आहे. जाणून घ्या याबाबत नेमके नियम काय आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: सणवार, निवडणुका आल्या-झाल्या की आपल्याकडे हिंदू-मुस्लिम वाद सुरू होतातच. कोणताही नेता, पक्ष, धर्म, जात, समुदायाच्या मर्जीने देश चालत नाही तर संविधान, कायद्यानेच चालतो. पण आपल्याकडे कोणाची सरकारं येणार, त्या पक्षाची विचारधारा काय यादृष्टीने धार्मिक गोष्टींना परवानगी मिळते किंवा बंदी येते. तुम्ही पण आपापसात या विषयांवर चर्चा करत असाल तेव्हा नमाज रस्त्यावर पढायचा की नाही, बकऱ्यांची कुर्बानी उघड्यावर द्यायची की नाही, भारतात काय होतं आणि मुस्लिम देशांमध्ये काय होतं यावरूनच बाचाबाची होत असेल, याच प्रश्नांची उत्तरं समजून घेऊयात.
बकरी ईदनिमित्त नवं राजकारण
बकरी ईदनिमित्त हाऊसिंग सोसायट्यांमध्ये बकऱ्यांच्या कुर्बानीचा विषय पुन्हा एकदा वादात आला. मुस्लिम समाजाचं म्हणणं असतं की कुर्बानीपर्यंत बकऱ्यांना ठेवणार कुठे आणि हिंदूंचं म्हणणं असतं की हाऊसिंग सोसायटीमध्ये कुर्बानी किंवा बकरी पाळणं ह्याने सार्वजनिक आरोग्यपासून अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात.
हे ही वाचा>> समजून घ्या: सुप्रीम कोर्टाचा SIR वर निकाल, आता महाराष्ट्रात काय होणार?
2023 मध्ये ठाण्यातील मिरा रोडमध्ये एक व्यक्ती हाऊसिंग सोसायटीत २ बकऱ्यांना कुर्बानीसाठी घेऊन आलेला, त्यावेळी हा वाद मुंबई उच्च न्यायालयात गेलेला, कोर्टाने 2019 च्याच एका ऑर्डरचा दाखला देत म्हटलं की जनावरांची कुर्बानी त्याच ठिकाणी होईल जी ठिकाणं स्थानिक स्वराज्य संस्थांनी ठरवून दिली असतील. हाऊसिंग सोसायटीत जनावरांची कुर्बानी दिली जाऊ शकत नाही, असं झाल्यास कारवाई होईल. 1 किलोमीटर परिसरात कत्तलखाने किंवा कुर्बानीची जागा पालिकेने ठरवून दिली असेल तर हाऊसिंग सोसायटीत कुर्बानी देता येणार नाही, आताही मुंबईत 100 च्या घरात अशा कुर्बानीसाठी जागा ठरवून देण्यात आलेल्या आहेत. पण कोर्टाच्या निर्णयात एक लूपहोल होता तो म्हणजे कोर्ट हे तर सांगतंय की हाऊसिंग सोसायटीत कुर्बानी नको, पण कुर्बानी आधी या जनावरांना तिथं पाळलं जाऊ शकतं की नाही ह्याबाबत मात्र स्पष्टता नाही.
हे ही वाचा>> समजून घ्या: युतीचा इतिहास आणि 'ती' भळभळीत जखम, शिंदेंना का करावी लागते दिल्लीवारी?
त्यामुळे मिरा रोडमध्ये हाऊसिंग सोसायटीत मुस्लिम कुटुंबाने बकरी तर आणली पण हिंदू समाजाने त्याला विरोध केला, आरोग्यापासून अनेक कारणं पुढे करत नंतर आपसूकच त्याला धार्मिक रंग चढला. पण हिंदूंचं असंही म्हणणं असतं की मुस्लिम देशांमध्ये या गोष्टींना बंदी असताना भारतातच हा कुर्बानीचा अट्टाहास का?









