इंटेलिजन्स ब्युरोचा इशारा, अन् कॉकरोज जनता पार्टीचं X हँडल बंद, इन्स्टा अकाऊंटवरही कारवाई?

मुंबई तक

Cockroach janta party X account : भारताच्या सार्वभौमत्वाला आणि सुरक्षेला धोका असल्याचे सांगत केंद्र सरकारने इंटेलिजन्स ब्युरोच्या (IB) इशाऱ्यावरून 'कॉकरोच जनता पार्टी'चे एक्स (ट्विटर) खाते भारतात ब्लॉक केले आहे.

ADVERTISEMENT

Cockroach janta party X account
Cockroach janta party X account
google news

बातम्या हायलाइट

point

कॉकरोच जनता पार्टीचं X हँडल कशामुळं केलं बंद? कारण समोर

point

इन्स्टाग्राम अकाऊंटवरही होणार कारवाई?

Cockroach janta party X account : 'बेरोजगार तरुण कॉकरोच बनून व्यवस्थेवर हल्ला करतात", असं वक्तव्य भारताचे सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांनी केलं होतं. त्यानंतर त्यांच्या वक्तव्याला विरोध करण्यासाठी एका मराठी तरुणाने सोशल मीडियावर 'कॉकरोच जनता पार्टी' या व्यंगात्मक एक्स (ट्विटर) हँडल सुरु झाले होते. मात्र, 'कॉकरोच जनता पार्टी' या एक्स (ट्विटर) हँडलवर केंद्र सरकारने मोठी कारवाई केली आहे. "इंटेलिजन्स ब्युरोने (IB)  हा राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने चिंतेचा विषय असल्याचे सांगण्यात आल्यानंतर ही कारवाई झाली", असं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलंय. याबाबतचं वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलंय.

हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यात हवामान बदलाचे वारे, 'या' जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

"देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकत होता"

माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 च्या कलम 69 (A) अंतर्गत कॉकरोज जनता पार्टीचे एक्स हँडल ब्लॉक करण्यास सांगितले असून, हे आदेश एका गोपनीय चौकटीत जारी केले जात असल्याने अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली. आयबीच्या मते, हे खाते प्रक्षोभक मजकूर पोस्ट करत होते, ज्यामुळे देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकत होता आणि तरुणांमध्ये या खात्याचा वाढता प्रभाव ही मुख्य चिंतेची बाब ठरली होती.

हेही वाचा : उल्हासनगर : भररस्त्यात थरारक गोळीबार, सात राऊंड फायर; किती जणांचा गेला जीव?

माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम 69 (A) केंद्र सरकारला देशाची सार्वभौमत्व, सार्वजनिक सुव्यवस्थेला धोक्यात आणणारी चिथावणी देण्यापासून रोखण्यास निर्बंध घालण्याचा अधिकार देते. ही संपूर्ण प्रक्रिया माहिती तंत्रज्ञान नियम, 2009 च्या अंतर्गत चालविली जाते आणि ब्लॉक करण्याचे हे आदेश गोपनीय असतात. हे खाते सध्या भारतात ब्लॉक करण्यात आले असले तरी इतर देशांमध्ये ते पाहाता येत आहे. गुरुवार संध्याकाळपर्यंत त्याचे 2 लाखांहून अधिक फॉलोअर्स होते.

एका दुसऱ्या अधिकाऱ्याने सांगितले की, जेव्हा या खात्याचे साधारण 90 हजार फॉलोअर्स होते, तेव्हाच हे आदेश पाठवण्यात आले होते. या चळवळीशी संबंधित इन्स्टाग्राम हँडल अद्याप भारतात ब्लॉक केलेले नाही आणि गुरुवारपर्यंत त्याचे 16 दशलक्षहून अधिक फॉलोअर्स होते, परंतु ते खाते देखील ब्लॉक करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

हे वाचलं का?