समजून घ्या: कच्चं तेल स्वस्त झालं तरीही पेट्रोल-डिझेल का महाग... सरकार का करतंय असं?
Petrol Diesel Price Hike: पेट्रोल आणि डिझेलसाठी लागणाऱ्या कच्च्या तेलाच्या किंमती या कमी झाल्या आहेत. मात्र, असं असलं तरीही पेट्रोल -डिझेल तूर्तास तरी काही स्वस्त होणार नाही. समजून घ्या नेमकं असं का होतंय.
ADVERTISEMENT

मुंबई: गूड न्यूज...आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किंमती ज्या 115 डॉलर प्रति बॅरलच्या घरात गेलेल्या त्या आता 90 डॉलर प्रतिबॅरलपर्यंत घसरल्या आहेत. पण बॅड न्यूज ही आहे की, तरीही भारतात पेट्रोल डिझेल स्वस्त होणार नाही. का ते सविस्तर समजून घेऊया.
पेट्रोल-डिझेलच्या किंमती गेल्या 15 दिवसांतच 4 वेळा वाढल्या आहेत. 15 मेपासून 3 रूपये ते आता अधूनमधून काही पैशांनी दर वाढवले जात आहेत. माहीत नाही कदाचित ही वाचेपर्यंत किंमती अजून एकदा वाढलेल्या असतील. पण तुम्हाला माहितेय, आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या कच्च्या तेलाच्या किंमती महागल्यात म्हणून तुम्हाला आता महागडं पेट्रोल-डिझेल घ्यावं लागतंय असं सांगितलं जात होतं, त्या कच्च्या तेलाच्या किंमती तर घसरल्या आहेत. तरीही तुम्हाला महागड्या पेट्रोल-डिझेलचा भुर्दंड का?
कारण, कमजोर रूपया आणि तेल कंपन्यांचं मधल्या काळात झालेलं नुकसान. 28 फेब्रुवारीपासून इराण-अमेरिका युद्ध सुरू झालं, तेव्हापासून कच्च्या तेलाच्या किंमती आंतरराष्ट्रीय पातळीवर 50 टक्क्यांनी वाढल्या. पण त्यावेळी भारतातल्या तेल कंपन्यांनी दर वाढवले नाहीत.
पाहा कोणत्या तेल कंपन्यांना किती नफा आणि किती तोटा
1. इंडियन ऑईल- जानेवारी ते मार्च नफा 15 हजार कोटी पण एप्रिल-मेमध्ये 35-45 हजार कोटींचं नुकसान
2. भारत पेट्रोलियम- जानेवारी ते मार्च 5 हजार कोटींचा नफा पण एप्रिल-मे मध्ये 18-22 हजार कोटींचं नुकसान
3. हिंदुस्थान पेट्रोलियम- जानेवारी ते मार्च नफा 4901 कोटी. नुकसान 17-20 हजार कोटी









