'माझ्या नावाने बनावट खाते', रुपाली चाकरणकरांच्या बहिणीची 8 तास पोलीस चौकशी, खरातवर केले गंभीर आरोप
Ashok Kharat Case : 'जी खाती आहेत ती बनावट आहेत, आपण तिथे कुठेही सह्या केलेल्या नाहीत.एकाही रुपयाची आपण उलाढाल केलेली नाही', असा दावा राष्ट्रवादी कांग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांनी केला. दरम्यान, प्रतिभा चाकणकर आणि मुलगा तन्मयची शिरडी पोलिसांनी कसून चौकशी केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
57 खातेदारांच्या नावावर 100 खाती उघडल्याचा धक्कादायक प्रकार
भगिनी प्रतिभा आणि त्यांचा पुतण्या तन्मय यांच्या नावावर राहाता समता बँकेत चार खाती
Ashok Kharat Case : 'जी खाती आहेत ती बनावट आहेत, आपण तिथे कुठेही सह्या केलेल्या नाहीत.एकाही रुपयाची आपण उलाढाल केलेली नाही', असा दावा राष्ट्रवादी कांग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांनी केला. दरम्यान, प्रतिभा चाकणकर आणि मुलगा तन्मयची शिरडी पोलिसांनी कसून चौकशी केली. ही चौकशी आज दि : 13 एप्रिल 2026 रोजी करण्यात आली. या प्रकरणात त्यांनी अशोक खरात प्रकरणाबाबत धक्कादायक दावा केला. सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत शिर्डी पोलिसांनी चाकणकर यांच्याकडून खात्यांबाबत कसून चौकशी केली आहे. त्यानंतर हे प्रकरण पुन्हा चर्चेचा विषय ठरत आहे.
हे ही वाचा : स्वरसम्राज्ञी आशाताई अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, उपस्थितांना अश्रू अनावर
57 खातेदारांच्या नावावर 100 खाती उघडल्याचा धक्कादायक प्रकार
राहाता येथील समता पतसंस्थेत तब्बल 57 खातेदारांच्या नावावर 100 खाती खोटी खाती उघडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यानंतर भोंदू प्रकाश खरात याचेच नाव नॉमिनी लावण्यात आले होते. खात्यांसाठी वापरण्यात आलेले मोबाईल क्रमांकही त्याचाच होता. आतापर्यंत 35 खातेदारांशी शिर्डी पोलिसांनी कसून चौकशी केली आहे.
प्रत्यक्षात किंवा अप्रत्यक्षात कोणतेही खाते बँकेत उघडले नसल्याचा खातेदारांचा दावा
संबंधित प्रकरणात सर्व खातेदारांनी सांगितलं की, प्रत्यक्षात किंवा अप्रत्यक्षात कोणतेही खाते बँकेत उघडले जाणार नाही. उर्वरित खातेदारांचीही शिर्डी पोलिसांनी कसून चौकशी केली. देवदर्शनाच्या नावाखाली खरातने कागदपत्रे घेतली होती. अशातच खरात आणि समता बँकेच्या मॅनेजरविरोधात राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
हे ही वाचा : पुण्यात PhD चे शिक्षण घेणाऱ्या 30 वर्षीय तरुणीनं संपवलं जीवन, सुसाईड नोटमध्ये छेडछाडीचा आरोप अन् भयंकर...
भगिनी प्रतिभा आणि त्यांचा पुतण्या तन्मय यांच्या नावावर राहाता समता बँकेत चार खाती
दरम्यान, रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा आणि त्यांचा पुतण्या तन्मय यांच्या नावावर राहाता समता बँकेत चार खाती उघडण्यात आली. याच खात्यातून तब्बल 2 कोटींची उलाढाल झाल्याची माहिती समोर आली. चाकणकरांनी शिर्डी पोलिसांना बोलावल्याची माहिती समोर आली.









