पुण्यात PhD चे शिक्षण घेणाऱ्या 30 वर्षीय तरुणीनं संपवलं जीवन, सुसाईड नोटमध्ये छेडछाडीचा आरोप अन् भयंकर...
Pune Crime : पुणे शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 30 वर्षीय पीएचडीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीने आपलं जीवन संपवलं आहे. संबंधित प्रकरण चिंचवड परिसरातील असून या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. अशातच या घटनेला एक वेगळं वळण प्राप्त झालं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पीएचडीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात आरोपी अटकेत
विनयभंगाशी संबंधित आरोपीवर गुन्हा
Pune Crime : पुणे शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 30 वर्षीय पीएचडीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीने आपलं जीवन संपवलं आहे. संबंधित प्रकरण चिंचवड परिसरातील असून या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. अशातच या घटनेला एक वेगळं वळण प्राप्त झालं आहे. या प्रकरणातून माहिती समोर आली की, विद्यार्थीनीचं काही काळावधीपासून मानसिक संतुलन बिघडलं होतं.
हे ही वाचा : 'मधुचंद्राच्या रात्री...,' नवविवाहितेची नको तीच अट, नवरदेवाला फुटला घाम, पुढं भयंकर घडलं
या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत वरिष्ठ अधिकाऱ्याला अटक केली. हे प्रकरण केवळ आत्महत्येशी संबंधित नसून मानसिक छळाशी जोडण्यात आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अटक केलेल्या आरोपीची ओळख कोरेगाव पार्कमधील भारतीय वनस्पती कार्यालयाचे प्रमुख डॉ. ए. बेंजामिन अशी पटली होती.
पीएचडीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात आरोपी अटकेत
डॉ. बेंजामिन हे मृत विद्यार्थिनीचे संशोधन मार्गदर्शक होते. मागील दोन वर्षांपासून तरुणी त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पीएचडीचे शिक्षण घेत होती. पीडित विद्यार्थिनीने पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. नंतर आरोपीला ताब्यात घेत त्यांना अटक केली. तपासादरम्यान पीडित विद्यार्थिनीची एक सुसाईड नोट समोर आली, ती सुसाइड नोट महत्त्वाचा पुरावा ठरली आहे.
विनयभंगाशी संबंधित आरोपीवर गुन्हा
पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे आणि महिलेवर हल्ला व विनयभंगाशी संबंधित गुन्हा दाखल केला. तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे असे की, सर्व आरोपांचे गांभीर्य ओळखून चौकशी केली जात असून पुराव्याच्या आधारे पुढील कारवाई केली. प्रकारणाचे गांभीर्य लक्षात घेत, पोलीस बारकाईने तपास करत आहेत.









