कल्याण-मुरबाड महामार्गावर भीषण अपघात, ईको कार आणि सिमेंट मिक्सर ट्रकच्या धडकेत 11 जणांचा दुर्दैवी अंत
Kalyan-Murbad Accident : कल्याण-मुरबाड महामार्गावर एक भीषण अपघात घडल्याची धक्कादायक घटना आहे. ईको कार आणि सिमेंट मिक्सर ट्रकची एकमेकांना जोरदार धडक लागली आणि या अपघातात तब्बल अकरा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामध्ये अन्य काहीजण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सिमेंट मिक्सर आणि इको कारच्या धडकेत प्रवाशी कारमध्ये अडकून बसले
अपघातात 11 जणांचा दुर्दैवी अंत
Kalyan-Murbad Accident : कल्याण-मुरबाड महामार्गावर एक भीषण अपघात घडल्याची धक्कादायक घटना आहे. ईको कार आणि सिमेंट मिक्सर ट्रकची एकमेकांना जोरदार धडक लागली आणि या अपघातात तब्बल अकरा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामध्ये अन्य काहीजण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली. संबंधित प्रकरणात चिंतेची बाब म्हणजे अशी की, मृतांच्या आकड्यात मोठी वाढ झाली आहे, या घटनेनं परिसर हादरून गेल्याचं चित्र आहे.
हे ही वाचा : बीड : दुसरी बायको माहेरी गेली, सावत्र मुलीला पाहून बाप सैतान बनला, घरातच जबदरस्तीने लैंगिक अत्याचार
सिमेंट मिक्सर आणि इको कारच्या धडकेत प्रवाशी कारमध्ये अडकून बसले
अपघात इतका भीषण होता की, दोन वाहनांच्या धडकेनंतर ईको कारचा जागीच चक्काचूर झाला. सिमेंट मिक्सर आणि इको कारच्या धडकेत प्रवाशी कारमध्ये अडकून बसले, त्यांना बाहेर पडता आलं नाही. अपघाताचा आवाज इतका भयंकर होता परिसरातील नागरिकही भयभीत झाले होते. अशातच स्थानिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत घटनेची माहिती मिळवली. त्यानंतर महामार्ग पोलीस आणि स्थानिक पोलीस प्रशासनाने घटनस्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने कारमधील अडकलेले मृतदेह आणि जखमींना बाहेर काढण्यात यश मिळवले.
अपघातात 11 जणांचा दुर्दैवी अंत
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरती एका पुलावरती हा भीषण अपघात झालाय. कल्याण ते मुरबाड अशी प्रवासी वाहतूक करणारी ही ईको कार होती. रायते पुलावर या दोन्ही वाहनांची समोरासमोर धड़क झाली ज्यात 11 जणांना प्राण गमवावे लागले.
हे ही वाचा : मोठी बातमी : अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांच्या बहिणीची गेल्या 3 तासांपासून चौकशी सुरु
स्थानिक नागरिकांनी या अपघाताबाबत दिलेल्या माहितीनुसार, ईको कारमधून सर्व प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले तर जखमींना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय.









