जालना : आई बाहेरगावी गेली अन् मैत्रिणीला घरी बोलावले, नंतर साहिलने केले भयानक कांड

मुंबई तक

कॉलेजमधील एका तरुणीला साहिलने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. एके दिवशी त्याची आई बाहेरगावी गेल्यानंतर तरुणीला घरी बोलावून घेतले. यानंतर त्या तरुणीला भयानक गोष्टीला सामोरे जावे लागले.

ADVERTISEMENT

Jalna Crime
Jalna Crime
google news

बातम्या हायलाइट

point

आई बाहेरगावी गेली

point

मैत्रिणीला घरी बोलावले

point

साहिलने केले भयानक कांड

Jalna Crime, गौरव साळी : जालना शहरात एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कदिम जालना पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. साहिल शहनवाज अन्सारी (रा. मिल्लतनगर, जालना) असे आरोपीचे नाव असून न्यायालयाने त्याला 20 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

एकाच कॉलेजमध्ये घेतात शिक्षण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी आणि आरोपी हे दोघेही जालना शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेतात. आधी आरोपीने विद्यार्थिनीशी ओळख वाढवत तिच्याशी जवळील वाढवली. ओळख वाढल्यानंतर आरोपीने विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तो तिला बुरखा घालून शहरातील विविध ठिकाणी फिरायला नेत होता. या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर आरोपीचे वडील हे कामानिमित्त बाहेर असतात, तर मुलगा शहरातील एका महाविद्यालयात शिकत असल्याने तो आईसोबत जुना जालन्यातील मिल्लतनगर भागात खोली करून राहत होता. 

हे ही वाचा : धाराशिव : 20 वर्षीय प्रियकरासोबत मिळून नवऱ्याचे दगडाने ठेचले डोके, 28 वर्षीय पत्नीसह 7 जण ताब्यात

आई बाहेरगावी गेल्यानंतर..

दरम्यान, आई बाहेरगावी गेल्याची संधी साधून आरोपीने विद्यार्थिनीला बुरखा घालून आपल्या खोलीवर नेले. त्यानंतर संबंध ठेवण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला. मात्र, विद्यार्थिनीने नकार दिला. मात्र, लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने तिच्यावर जबरी अत्याचार केला. लग्न केले नाही तर मी आत्महत्या करीन, अशी धमकी देत आरोपीने तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. 

हे ही वाचा : अमरावती : परतवाडा स्कँडलप्रकरणातील आरोपीने रस्त्यात साजरा केला वाढदिवस, पोलिसांनीही भरवला होता केक! व्हिडिओ

आईला सांगितला घडलेला प्रकार

घडलेला प्रकार विद्यार्थिनीने आपल्या आईला सांगितल्यानंतर दोघींनी कदिम जालना पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी अत्याचारासह जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास डीवायएसपी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कदिम जालना पोलीस करीत आहेत. दरम्यान, या धक्कादायक घटनेने जालना शहर हादरले असून सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
 

हे वाचलं का?