धाराशिव : 20 वर्षीय प्रियकरासोबत मिळून नवऱ्याचे दगडाने ठेचले डोके, 28 वर्षीय पत्नीसह 7 जण ताब्यात
गुरुवारी (16 एप्रिल) सकाळी ते प्रात: विधीसाठी गावालगतच्या ओढ्याजवळ गेले होते. बराच वेळ होऊनही ते परत न आल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता, त्यांचा मृतदेह ओढ्याच्या काठावर पळसाच्या झाडाखाली रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
धाराशिव : 20 वर्षीय प्रियकरासोबत मिळून नवऱ्याचे दगडाने ठेचले डोके,
28 वर्षीय पत्नीसह 7 जण ताब्यात
Dharashiv Crime, गणेश जाधव : तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथे झालेल्या 36 वर्षीय युवकाच्या निर्घृण हत्येचा तुळजापूर पोलिसांनी अवघ्या 24 तासांत उलगडा केला आहे. या प्रकरणात मयताची पत्नी प्रतिभा साठे (वय 28) आणि तिचा प्रियकर शुभम घाटुळे (वय 20) यांना ताब्यात घेण्यात आले असून, आणखी काही जणांचा सहभाग आहे का याचा तपास सुरू आहे. एकूण 7 संशयितांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. कृष्णनाथ आनंद साठे असे मृत युवकाचे नाव आहे.
गुरुवारी (16 एप्रिल) सकाळी ते प्रात: विधीसाठी गावालगतच्या ओढ्याजवळ गेले होते. बराच वेळ होऊनही ते परत न आल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता, त्यांचा मृतदेह ओढ्याच्या काठावर पळसाच्या झाडाखाली रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली.
निर्घृण हल्ला; मृतदेह फरफटत नेला
पोलिस तपासात हा खून अनैतिक संबंधातून अत्यंत क्रूर पद्धतीने केल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपींनी कृष्णनाथ यांच्या डोक्यात काठी दगड घालून तसेच तीक्ष्ण हत्याराने वार करून त्यांची हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पोत्यात भरून टेम्पोच्या सहाय्याने सुमारे 90 फूट अंतरापर्यंत फरफटत नेऊन ओढ्याच्या काठावर टाकण्यात आला.
हे ही वाचा : अमरावती : परतवाडा स्कँडलप्रकरणातील आरोपीने रस्त्यात साजरा केला वाढदिवस, पोलिसांनीही भरवला होता केक! व्हिडिओ
अनैतिक संबंधातून रचला कट
प्राथमिक तपासात हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे उघड झाले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मृताच्या पत्नीचे गावातील तरुणाशी संबंध होते. शुभम घाटुळे याच्यासोबतचे संबंध पतीच्या निदर्शनास आल्यानंतर पती-पत्नीमध्ये वाद झाला होता. यानंतर दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेत पतीचा काटा काढण्याचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे. तपासादरम्यान आरोपींनी कृष्णनाथ यांना गॅस शेगडी आणण्याच्या बहाण्याने शेतात बोलावून धारदार शस्त्र, काठी व दगडाने हल्ला करून हत्या केल्याची कबुली दिली आहे. मृतदेह पोत्यात टाकून टमटमच्या सहाय्याने 90 फूट फरफटत नेण्यात आला आणि नंतर ओढ्याजवळ टाकण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.









