अमरावती : परतवाडा स्कँडलप्रकरणातील आरोपीने रस्त्यात साजरा केला वाढदिवस, पोलिसांनीही भरवला होता केक! व्हिडिओ
मुख्य आरोपी अयान अहमद याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अयान रस्त्यावर आपला वाढदिवस साजरा करताना दिसत असून, चक्क पोलीस कर्मचारीही यामध्ये सहभागी झाले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अमरावती : परतवाडा स्कँडलप्रकरणातील आरोपीने रस्त्यात साजरा केला वाढदिवस
पोलिसांनीही भरवला होता केक!
व्हिडिओ
Amravati Video Scandal, धनंजय साबळे : अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे उघडकीस आलेल्या व्हिडिओ स्कँडल प्रकरणात एक खळबळजनक बाब समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अयान रस्त्यावर आपला वाढदिवस साजरा करताना दिसत असून, चक्क पोलीस कर्मचारीही यामध्ये सहभागी झाले आहेत. हा व्हिडिओ सुमारे एक वर्ष जुना असल्याचे सांगितले जात असून, यामुळे पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पोलिसांनी भरवला केक
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये आरोपी अयान अहमद ‘Boss’ लिहिलेली हुडी घालून भर चौकात केक कापताना, आतिषबाजी करताना आणि जल्लोष करताना स्पष्टपणे दिसत आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, यावेळी एक पोलीस अधिकारी आणि दोन कर्मचारी त्याला रोखण्याऐवजी त्याचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्याला केकही भरवल्याचं स्पष्ट दिसत आहे. यामुळे पोलिसांवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. भर चौकातील हा प्रकार पोलिसांनी का थांबवला नाही? पेट्रोलिंग करत असताना पोलिसांनी नियम डावलले का? असे असेल तर पोलीस आणि आरोपीमध्ये काही लागेबांधे आहेत का? असे प्रश्न आता विचारले जात आहेत.
हे ही वाचा : Personal Finance: Term insurance खरेदी करताना करू नका 'या' 6 चुका, नाहीतर...
विभागीय चौकशी सुरु
या गंभीर प्रकाराची दखल घेत अमरावतीचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी तात्काळ कठोर पावले उचलली आहेत. व्हिडिओमध्ये दिसणारे एक अधिकारी आणि दोन पोलीस कर्मचारी, ज्यांच्यावर गंभीर आरोप आहेत, त्यांना तात्काळ मुख्यालयाशी संलग्न (Headquarter Attached) करण्यात आले आहे. या कारवाईमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. याशिवाय, स्कँडल प्रकरण आणि या नव्या व्हिडिओमुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, अन्य तीन पोलीस कर्मचाऱ्यांवरही वेगवेगळे आरोप समोर आले आहेत. परिणामी, या तिघांनाही मुख्यालयाशी संलग्न करून त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.
हे ही वाचा : "चाणक्य आज जिवंत असते तर त्यांनाही धक्का बसला असता...", त्या टोमण्यावर अमित शाहाही गदागदा हसले!
तपास निष्पक्ष व्हावा म्हणून..
पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी या कारवाईवर स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, ही कारवाई चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शक ठेवण्यासाठी करण्यात आली आहे. ज्या कर्मचाऱ्यांवर आरोप आहेत, त्यांना सध्या मुख्य पोस्टिंगवरून हटवून मुख्यालयात पाठवण्यात आले आहे, जेणेकरून ते चौकशीवर कोणताही प्रभाव टाकू शकणार नाहीत. जर चौकशीत ते दोषी आढळले, तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, आणि जर आरोप खोटे ठरले, तर त्यांना पुन्हा त्यांच्या मूळ पोस्टिंगवर रुजू करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.









