बदलापूर : पाचवीत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर बसमध्ये विनयभंग, पीडितेनं सांगितला घटनेचा थरार
Badlapur crime : बदलापूर शहरात इयत्ता पाचवीत शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर शाळेच्या बस चालकाने विनयभंग केला. या प्रकरणी 38 वर्षीय बस चालक जयेश मुने याला पोलिसांनी अटक करून कल्याण न्यायालयात हजर करण्यात करण्यात आले. या प्रकरणात आरोपीला 2 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत सुनावली आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर घडल्याचे वृत्त आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बदलापूर शहरात इयत्ता पाचवीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर विनयभंग
विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
Badlapur Crime : बदलापूर शहरात इयत्ता पाचवीत शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर शाळेच्या बस चालकाने विनयभंग केला. या प्रकरणी 38 वर्षीय बस चालक जयेश मुने याला पोलिसांनी अटक करून कल्याण न्यायालयात हजर करण्यात करण्यात आले. या प्रकरणात आरोपीला 2 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत सुनावली आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर घडल्याचे वृत्त आहे.
हे ही वाचा : 'सर्वांसमोर सर्व काही...' वाल्मिक कराडच्या मुलाची सोशल मीडिया पोस्ट, बीड पुन्हा चर्चेत
विद्यार्थिनीच्या विनयभंगामुळे आरोपीच्या मुसक्या आवळल्या
पीडितेनं घरी पोहोचताच घडलेला घटनाक्रम पालकांना सांगितला. त्यानंतर पीडितेच्या पालकांनी मध्यरात्री बदलापूर पश्चिम पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत वांगणीत राहणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या. संबंधित आरोपी हा गेली आठ वर्षांपासून बस ड्रायव्हर म्हणून करत होता.
विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
अशा घटनेनं लहान विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. बसमध्ये शाळेतील विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी महिला मदतनीस असणे गरजेचे आहे. ही घटना घडली तेव्हा बसमध्ये महिला मदतनीस नव्हती, त्या महिलेच्या अनुपस्थितीमुळे अशी लज्जास्पद घटना घडली. या प्रकरणी आता पोलिसांनी बस मालक तसेच शाळा व्यवस्थापनालाही नोटीस बजावून चौकशीसाठी बोलावले आहे.
हे ही वाचा : पाणीपुरीत विष टाकूत गर्भवतीला मारण्याचा कट, नंतर जंगलात नेलं अन्... हादरवून टाकणारी घटना
या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांच्याकडे सोपवण्यात आला. आरोपीने इतर आणखी किती विद्यार्थिनींसोबत असे कृत्य केले याचा पोलीस तपास घेत आहेत. आरोपीच्या मोबाईलचे पुरावे तपासले जात असून संभाव्य पीडितांचा शोध घेतला जात आहे.










