'सर्वांसमोर सर्व काही...' वाल्मिक कराडच्या मुलाची सोशल मीडिया पोस्ट, बीड पुन्हा चर्चेत

मुंबई तक

Beed News : बीड जिल्ह्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सध्या वाल्मिक कराड न्यायालयीन कोठडीत आहेत. अशातच त्यांचा मुलगा सुशील कराड यांने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ती पोस्ट सध्या सर्वत्र व्हायरल होताना दिसतेय. सुशील कराडच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे पुन्हा एकदा बीड चर्चेत येण्याची शक्यता आहे. 

ADVERTISEMENT

Beed News
Beed News
google news

बातम्या हायलाइट

point

वाल्मिक कराड न्यायालयीन कोठडीत

point

मुलगा सुशील कराडने केली सोशल मीडिया पोस्ट

point

जिल्ह्यात एकच खळबळ

Beed News : रोहिदास हातागळे - बीड जिल्ह्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सध्या वाल्मिक कराड न्यायालयीन कोठडीत आहेत. अशातच त्यांचा मुलगा सुशील कराड यांने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ती पोस्ट सध्या सर्वत्र व्हायरल होताना दिसतेय. सुशील कराडच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे पुन्हा एकदा बीड चर्चेत येण्याची शक्यता आहे. 

हे ही वाचा : नवी मुंबई: मॅट्रिमोनिअल साइटवर महिलांशी ओळख, नंतर लैंगिक शोषण अन् पैसे सुद्धा उकळले! पोलिसांनी केला पर्दाफाश

वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडची फेसबुक पोस्ट चर्चेत 

वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडने सोशल मीडियावर 'आता मात्र सर्वांसमोर सर्व काही बोलणार', अशा आशयाची पोस्ट लिहिली होती.त्याच्या या पोस्टमुळे अनेक तर्क वितर्कांची चर्चा होऊ लागली आहे. सुशील कराड नेमकं काय बोलणार? संबंधित प्रकरणात आता नेमके कोणते खुलासे करणार? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. 

मस्साजोगचे माजी सरपंच आणि दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यात संतापाची लाट उसळली होती. या धक्कादायक प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी केली जात होती. याच प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर देखील गंभीर आरोप केले होते. यानंतर काही महिने ओलांडले असून सुशील कराडने केलेल्या या एका पोस्टने खळबळ उडाली आहे. 

हे ही वाचा : पाणीपुरीत विष टाकूत गर्भवतीला मारण्याचा कट, नंतर जंगलात नेलं अन्... हादरवून टाकणारी घटना

संबंधित पोस्टबाबत सुशील कराडने काहीही सांगितलेलं नाही. सुशील कराडने केलेल्या सोशल मीडियावरील पोस्टचा नेमका राजकीय अर्थ घ्यायचा की सामाजिक अर्थ काढायचा यात संभ्रम आहे. सोशल मीडियावरील केलेल्या या पोस्टमुळे मोठं गूढ वाढलेलं आहे. 

हे वाचलं का?