नांदेड : मामाच्या गावी जाताना चिमुकला कारखाली चिरडला, आई अन् बापाच्या डोळ्यादेखत...

मुंबई तक

Nanded Accident : नांदेडच्या पेट्रोलपंपावर हृदय पिळवटून टाकणारा धक्कादायक प्रकार घडला आहे. तीन वर्षांचा चिमुकला मामाच्या गावी आईसोबत आला होता. कुटुंबीय दुचाकीवरून बाहेर निघालं होतं. पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर गेले आणि चालत्या एका कारखाली कुटुंबीयांच्या डोळ्यादेखील चिरडला गेला.

ADVERTISEMENT

Nanded Accident
Nanded Accident
google news

बातम्या हायलाइट

point

मामाच्या गावी जाताना, चिमुकला कारखाली चिरडला

point

आईसह कुटुंबीयांनी घटनास्थळी हंबरडा फोडला

Nanded Accident : कुवरचंद मंडले - नांदेडच्या पेट्रोलपंपावर हृदय पिळवटून टाकणारा धक्कादायक प्रकार घडला आहे. तीन वर्षांचा चिमुकला मामाच्या गावी आईसोबत आला होता. कुटुंबीय दुचाकीवरून बाहेर निघालं होतं. पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर गेले आणि चालत्या एका कारखाली कुटुंबीयांच्या डोळ्यादेखील चिरडला गेला. चिमुकल्याच्या अपघाताचे हे चित्र मन हेलावून टाकणारे आहे. अचानकपणे घडलेल्या या घटनेनं सर्वांना मोठा धक्का बसला. 

हे ही वाचा : जनगणनेसाठी गेलेल्या शिक्षिकेला मुख्याध्यापकानंच..., नेमकं काय घडलं?

मामाच्या गावी जाताना, चिमुकला कारखाली चिरडला

घडलेल्या घटनेनुसार, मृत चिमुकल्याची ओळख शेख शयान शेख वाजिद (वय 3) अशी ओळख समोर आली. तो कुटुंबीयांसोबत परभणीतील जमजम कॉलनी परिसरातील रहिवासी होता. त्याच्या आईचं नांदेडमध्ये नई आबादी हे माहेर आहे. तो मामाच्या गावी जाताना, त्याचे वडील पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेले असता, त्याचदरम्यान ही मन हेलावून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. 

आईसह कुटुंबीयांनी घटनास्थळी हंबरडा फोडला

या घटनेनं परिसरात एकच गोंधळ उडाला होता, आईसह कुटुंबीयांनी घटनास्थळी हंबरडा फोडण्यास सुरूवात केली. अपघातात जखमी झालेल्या बाळाला रुग्णालयात दाखल केले, मात्र तोवर उशिर झाला. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पंपावरील सीसीटीव्हीचा तपास केल्यानंतर दिसून आले की, हा एक अपघात आहे. 

हे ही वाचा : अल्पवयीन मुलीच्या एकतर्फी प्रेमात झाला वेडा अन् नको तेच करुन बसला; धक्कादायक प्रकरण

या घटनेनं लहान मुलांच्या पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष द्यावं, तसेच त्यांची काळजी घ्यावी अशी शिकवण मिळते. तसेच पेट्रोल पंपसारख्या ठिकाणी वाहनांनी आपल्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. 

हे वाचलं का?