अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा नाहीच, पुढचा नेमका प्लॅन काय?

मुंबई तक

Dharmendra Pradhan : नीट आणि सीबीएसई परीक्षांमध्ये कथित गैरव्यवहारांविरोधात कॉकरोच जनता पार्टी दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर आंदोलन करत आहे. देशातील काही तरुणांनी त्यांच्या आंदोलनाला मोठा पाठिंबा दिला आहे. अशातच अभिजीत दिपके यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

ADVERTISEMENT

Dharmendra Pradhan
Dharmendra Pradhan
google news

बातम्या हायलाइट

point

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे राजीनाम्याची मागणी 

point

आंदोलनाला अरविंद केजरीवालांकडून पाठिंबा 

Dharmendra Pradhan : नीट आणि सीबीएसई परीक्षांमध्ये कथित गैरव्यवहारांविरोधात कॉकरोच जनता पार्टी दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर आंदोलन करत आहे. देशातील काही तरुणांनी त्यांच्या आंदोलनाला मोठा पाठिंबा दिला आहे. अशातच अभिजीत दिपके यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या आंदोलनात केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या पदाबाबत राजीनाम्यच्या मागणीने मोठा जोर धरला आहे. मात्र धर्मेद्र प्रधान यांनी अद्याप आपला राजीनामा दिलेला नाही, यामुळे येत्या काही दिवसांत हेच आंदोलन आणखी उसळण्याची शक्यता आहे. 

हे ही वाचा : स्वयंपाक करण्याच्या बहाण्याने तरुणीला घरात बोलावले, तोंडात कापडाचा बोळा कोंबून...

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे राजीनाम्याची मागणी 

याच आंदोलनादरम्यान दीपके यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र, निर्धारित वेळेनंतर राजीनामा न दिल्याने आता देशभरात आंदोलनाची लाट पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. येत्या आठवडाभरातच विविध शहरांमध्ये निदर्शने आयोजित केली जाणार असून पुढील शनिवारी दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर आणखी मोठं आंदोलन होणार असल्याची चर्चा आहे. 

आंदोलनाला अरविंद केजरीवालांकडून पाठिंबा 

अशातच या आंदोलनाला देशातील दिग्गज नेत्यांनी पाठिंबा दर्शवला आहे, ज्यात आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनी देखील पाठिंबा दर्शवला आहे. सोशल मीडियावरील एक्सवर पोस्ट करून त्यांनी आंदोलनामागे युवकांमधील असंतोष आणि नाराजी असल्याचे म्हटलं आहे. आंदोलनाला किंवा आंदोलनकर्त्यांना राष्ट्रविरोधी ठरवण्यापेक्षा सरकारने त्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावं आणि त्यांच्या मागण्यांची पूर्तता करावी, असं त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. 

हे ही वाचा : बीड : लग्नाला केवळ 13 दिवस, नवरीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून तलाठी नवऱ्यानं संपवलं जीवन

केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना तातडीने केंद्रीय शिक्षण मंत्रीपदावरून हटवण्याची मागणी केली. आम आदमी हा पक्ष सर्व मागण्यांना पाठिंबा देताना दिसत आहे. दरम्यान, नीट आणि सीबीएसई परीक्षेच्या पारदर्शकतेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. याच रागातून देशभरातून या संघटनेच्या माध्यमातून येणाऱ्या काहीच दिवसांत मोठं आंदोलन होताना दिसेल, अशी शक्यता वर्तवण्यात येते.  

हे वाचलं का?