काल जयंत पाटील अन् आव्हाडांनी भेट घेतली, अन् आज शिंदेंचा दिल्ली दौरा रद्द

ऋत्विक भालेकर

eknath shinde delhi visit cancel : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा तूर्तास रद्द झाला असून ते महाराष्ट्र सदनातील कार्यक्रमाला ऑनलाइन उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, नंदनवन येथे महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

ADVERTISEMENT

photo generated by AI
photo generated by AI
Google CTA

बातम्या हायलाइट

point

काल जयंत पाटील अन् आव्हाडांनी भेट घेतली

point

अन् आज शिंदेंचा दिल्ली दौरा रद्द

eknath shinde delhi visit cancel : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नियोजित दिल्ली दौरा तूर्तास रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे ते दिल्लीला जाणार नसून सकाळी अकरा वाजता महाराष्ट्र सदन येथे आयोजित कार्यक्रमाला ऑनलाइन माध्यमातून उपस्थित राहणार आहेत. या बदललेल्या कार्यक्रमामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. शिंदे यांच्या पुढील राजकीय बैठकींकडेही सर्वांचे लक्ष लागले असून, आज त्यांच्या मुंबईतील नंदनवन या निवासस्थानी महायुतीतील काही वरिष्ठ नेत्यांसोबत महत्त्वाची चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा : प्रेमासाठी धाडस केलं, पण फसला; प्रेयसीच्या घरात अकरावीच्या विद्यार्थ्यासोबत काय घडलं?

शरद पवार यांच्या पक्षाच्या भूमिकेबाबत तर्कवितर्कांना सुरुवात

या बैठकीचे महत्त्व वाढण्यामागचे कारण म्हणजे काल राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे वरिष्ठ नेते जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी नंदनवन येथे जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले होते. त्याआधी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतल्याने या सलग बैठका चर्चेचा विषय ठरल्या. त्यामुळे शरद पवार यांच्या पक्षाच्या भूमिकेबाबत  तर्कवितर्कांना सुरुवात झाली होती.

हेही वाचा : आदित्य ठाकरे, रोहित पवार की श्रीकांत शिंदे राज्याचा तरुण मुख्यमंत्री कोण होईल? अंकशास्त्रज्ञांनी दिलं उत्तर

हे वाचलं का?