नीचे पान की दुकान.... उपर सरकार का मकान?
maharashtra pan traders protest : सुगंधित तंबाखूवरील बंदी उठवण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाने आझाद मैदानात आंदोलन केले. यावेळी पान व्यापाऱ्यांनी हप्ता, कारवाई आणि व्यवसायावरील निर्बंधांबाबत सरकारवर गंभीर आरोप केले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नीचे पान की दुकान....
उपर सरकार का मकान?
maharashtra pan traders protest : महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यभर सुरू केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाने मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करत सुगंधित तंबाखूवरील बंदी उठवण्याची मागणी केली. महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की गुटख्यावर घालण्यात आलेल्या बंदीचे त्यांनी सुरुवातीपासून स्वागत केले होते, मात्र त्यानंतर सुगंधित तंबाखूवर लावण्यात आलेल्या बंदीमुळे पान व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा त्यांचा दावा आहे.
हेही वाचा : Maharashtra Weather : ये रे ये रे पावसा.., ऐन जुलै महिन्यात पाऊस गेला कुठे? 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट
पान दुकानदारांचा व्यवसाय जवळपास निम्म्यावर
पान व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार, ही बंदी लागू झाल्यानंतर अनेक पान दुकानदारांचा व्यवसाय जवळपास निम्म्यावर आला असून हजारो लहान व्यावसायिकांच्या रोजीरोटीवर त्याचा परिणाम झाला आहे. सरकारने सुगंधित तंबाखूवर बंदी कायम ठेवत असताना सिगारेट विक्रीला परवानगी दिल्याबद्दलही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या मते, सिगारेटमुळे फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका अधिक असल्याचा दावा करत सरकारने दोन्ही उत्पादनांबाबत समान धोरण अवलंबावे, अशी मागणी त्यांनी केली.
हेही वाचा : केतन अग्रवाल हत्याकांडातील आरोपी सिया गोयलच्या कुटुंबीयांच्या कंपनीवर FDA ची मोठी कारवाई










