बंदी असताना महाराष्ट्रात गुटखा कसा काय मिळतो? तुकाराम मुंढेंनी थेट कारण सांगितलं..
tukaram mundhe on illegal gutkha supply network : महाराष्ट्रात 2012 पासून गुटख्यावर बंदी असतानाही तो बाजारात कसा पोहोचतो, यामागील संपूर्ण साखळी तुकाराम मुंढेंनी स्पष्ट केली. गुटखा लॉबीवर कठोर कारवाईसोबतच नागरिकांनीच सेवन थांबवल्यास हा व्यवसाय संपुष्टात येईल, असे त्यांनी सांगितले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
गुटखा बंदी असताना कसं काय मिळतो?
तुकाराम मुंढेंनी थेट कारण सांगितलं..
tukaram mundhe on illegal gutkha supply network : महाराष्ट्रात गुटखा आणि सुगंधी तंबाखूवर 2012 पासून बंदी लागू असतानाही राज्यभरात त्याची विक्री सुरूच असल्याचा प्रश्न वारंवार उपस्थित केला जातो. याच मुद्द्यावर बोलताना अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुटखा बंदी असूनही तो बाजारात कसा पोहोचतो, यामागील कारण स्पष्ट केले. त्यांच्या मते, गुटख्याच्या अवैध व्यापारामागे मोठे नेटवर्क कार्यरत असून त्यांना रोखण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरही विचारमंथन सुरू आहे. फूड सेफ्टी कमिशनरला कायद्यातील कलम 30 अंतर्गत अशा उत्पादनांवर बंदी घालण्याचे अधिकार असून, प्रत्येक राज्याने याबाबत निर्णय घ्यायचा असतो. नुकत्याच झालेल्या बैठकीत सर्व राज्यांनी गुटख्यावर बंदी कायम ठेवण्याबाबत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा : Weather Report: महाराष्ट्रात पावसाचा अचानक ब्रेक, वरूणराजा बरसणार की नाही? मान्सूनबाबत IMD चा मोठा अंदाज
गुटखा तस्करीचं रॅकेट काम कसं करतं? वाहतूक कधी होते?
मुंढे यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्रात गुटख्याचे उत्पादन, उत्पादन प्रक्रिया, वाहतूक, साठवणूक आणि विक्री या सर्व बाबींवर बंदी आहे. कुठे उत्पादन होत असेल तर ते लपून केले जाते. आपल्याला माहिती मिळाली की, लगेच आपण कारवाई करतो. त्यामुळे राज्यात अधिकृत उत्पादन होत नसले तरी अवैध मार्गाने गुटखा राज्यात आणला जातो. त्यांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी मोठ्या ट्रकमधून गुटखा आणला जात होता. मात्र कारवाई वाढल्यानंतर आणि मकोकासारख्या कठोर कायद्यांचा वापर सुरू झाल्यानंतर तस्करांनी आपली पद्धत बदलली आहे. गोडाऊन राज्याच्या बॉर्डरच्या पलिकडे शिफ्ट केले गेले. ट्रकऐवजी आता लहान वाहनांमधून, विशेषतः रात्रीच्या वेळी गुटख्याची वाहतूक केली जाते आणि सकाळी विविध ठिकाणी त्याचे वितरण केले जाते. जिल्हा, तालुका आणि शहर स्तरावर समन्वयक नेमून संपूर्ण वितरण व्यवस्था उभी करण्यात आली असून हे समांतर नेटवर्क मोडून काढण्यासाठी सातत्याने कारवाई केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा : Personal Finance: लग्नासाठी सोने खरेदी करताना लाखो रुपये कसे वाचवाल? 'या' आहेत 10 गोल्डन टिप्स!










