ixigo कडून मुंबई मेट्रो प्रवाशांसाठी खास ऑफर; दरमहा मिळणार दोन मोफत मेट्रो तिकिटे

मुंबई तक

रेल्वे तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म ixigo कडून त्यांच्या यूजर्संना आता दरमहा दोन मोफत मुंबई मेट्रो तिकिटं मिळणार आहेत. जाणून घ्या याविषयी सविस्तर.

ADVERTISEMENT

special offer from ixigo for mumbai metro commuters get two free metro tickets every month
ixigo
Google CTA

मुंबई: भारतातील आघाडीचे AI-आधारित रेल्वे तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म ixigo Trains ने मुंबई मेट्रो प्रवाशांसाठी एक विशेष मोहीम सुरू केली असून, आता वापरकर्त्यांना दरमहा दोन मोफत मुंबई मेट्रो तिकिटांचा लाभ मिळणार आहे.

13 जुलैपासून सुरू झालेली ही मर्यादित कालावधीची ऑफर ixigo Trains अॅपच्या विद्यमान तसेच नव्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. या ऑफरअंतर्गत वापरकर्ते दर महिन्याला मुंबई मेट्रोची दोन तिकिटे (प्रत्येकी कमाल ₹70 मूल्यापर्यंत) मोफत मिळवू शकतात. यामुळे रोजच्या प्रवासाचा खर्च कमी होण्यासोबतच प्रवास अधिक सुलभ, किफायतशीर आणि लाभदायक ठरणार आहे.

मुंबईत सध्या पावसाळ्याचा जोर वाढत असताना, वाहतूक कोंडी आणि हवामानामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी मुंबई मेट्रो हा प्रवाशांचा सर्वाधिक विश्वासार्ह आणि पसंतीचा पर्याय बनला आहे. या पार्श्वभूमीवर ixigo ने ही मोहीम सुरू करत, डिजिटल तिकीट बुकिंगच्या सुविधेसह दैनंदिन प्रवास अधिक फायद्याचा करण्याचा प्रयत्न केला आहे.

ही ऑफर ixigo च्या एकात्मिक प्रवास अनुभव (End-to-End Travel Experience) निर्माण करण्याच्या व्यापक धोरणाचा एक भाग आहे. रेल्वे तिकीट बुकिंगसोबतच मेट्रो तिकीट सेवा उपलब्ध करून देत कंपनी देशभरातील लाखो प्रवाशांना एका प्लॅटफॉर्मवर अधिक सुविधा आणि मूल्य प्रदान करत आहे.

हे वाचलं का?