बळीराजासाठी आनंदाची बातमी, मंत्रिमंडळ बैठकीतील 8 धडाकेबाज निर्णय

मुंबई तक

Maharashtra Cabinet Meeting Decision : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी कर्जमाफीसह 8 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

ADVERTISEMENT

Maharashtra Cabinet decision
Maharashtra Cabinet decision
Google CTA

बातम्या हायलाइट

point

बळीराजासाठी आनंदाची बातमी

point

मंत्रिमंडळ बैठकीतील 8 धडाकेबाज निर्णय

Maharashtra Cabinet Meeting Decision : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत शेतकरी कर्जमुक्ती योजनेसह 8 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत कोणते निर्णय घेण्यात आले आहेत? सविस्तर जाणून घेऊयात... 

हेही वाचा : नवी मुंबई : नवरा घर सोडून गेल्याचा बनाव, प्रियकरासोबत राहायची, 11 महिन्यांनी पितळ उघड

मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)

दापचरी येथे उभारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार. दुग्ध प्रकल्पाची ५५८.४३ हेक्टर जमीन देण्याचा निर्णय. पालघर जिल्ह्यातील मौजे दापचरी ( ता.डहाणू) येथील दुग्ध प्रकल्पाची जमीन महाराष्ट्र राज्य कृषि पणन महामंडळास देण्यास मंजुरी. याठिकाणी आंतराष्ट्रीय दर्जाच्या कृषि बाजार उभारणीसह पणन विषयक सुविधा निर्माण करण्यात येणार. पालघर, ठाणेसह परिसरातील शेतकऱ्यांना सुविधेचा मोठा लाभ होणार. (सहकार व पणन)

शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी मोठा दिलासा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना- २०२६च्या निकषात सुधारणा. २०१९ च्या कर्जमाफी योजनेतील सुमारे १३ लाख शेतकऱ्यांसाठीची पन्नास हजार रुपयांपर्यंतची मर्यादा रद्द करून, नियमित कर्जमाफी. सन २०२६-२७ मधील नियमित परतफेडीची अट रद्द केल्याने २३ लाख शेतकऱ्यांनाही मिळणार प्रोत्साहनपर लाभ. (सहकार व पणन विभाग)

हे वाचलं का?