नवी मुंबई : नवरा घर सोडून गेल्याचा बनाव, प्रियकरासोबत राहायची, 11 महिन्यांनी पितळ उघड

मुंबई तक

Navi Mumbai Crime News : पोलिसांनी नवी मुंबईतील 11 महिन्यांपूर्वीच्या हत्येचा उलगडा करत मृताची पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराला अटक केली. पतीची हत्या करून मृतदेहाचे तीन तुकडे करून जंगलात फेकल्याचा आरोप दोघांवर आहे.

ADVERTISEMENT

Navi Mumbai Crime News
Navi Mumbai Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

नवी मुंबई : नवरा घर सोडून गेला

point

म्हणून प्रियकरासोबत राहिली, 11 महिन्यांनी पितळ उघड

Navi Mumbai Crime News,  नवी मुंबई : राबळे एमआयडीसी पोलिसांनी ऐरोलीच्या यादव नगर परिसरात सुमारे 11 महिन्यांपूर्वी घडलेल्या एका खळबळजनक हत्याकांडाचा पर्दाफाश केला आहे. पत्नीने प्रियकराची मदतीने नवऱ्याची हत्या केली होती. या प्रकरणात मृताची पत्नी सुनीता कुशवाहा (40) आणि तिचा कथित प्रियकर राहुल दशरथ प्रजापती (30) यांना अटक करण्यात आली आहे. दोघांवर सुनीताचा पती बलिराम सूर्यनाथ कुशवाहा (50) याची हत्या करून त्याच्या मृतदेहाचे तुकडे करत जंगलात फेकल्याचा आरोप आहे. 

हेही वाचा : 'कायदा सर्वांना समान', चुकीच्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींना तुकाराम मुंढेंचा इशारा

प्रियकराच्या मदतीने नवऱ्याला संपवलं 

स्थानिक न्यायालयाने दोन्ही आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, बलिराम हा पत्नी आणि राहुल यांच्यातील कथित प्रेमसंबंधाला विरोध करत होता. याच कारणावरून दोघांनी मिळून त्याची हत्या करण्याचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे.

हेही वाचा : 'कायदा सर्वांना समान', चुकीच्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींना तुकाराम मुंढेंचा इशारा

हे वाचलं का?