प्रेयसीसाठी प्रियकर बनला 'किलर', पेट्रोल पंपावर रक्तरंजित थरार
पेट्रोल पंपावर काम करणारा एक सेल्समन तरुणीला त्रास देत होता. ही गोष्ट तरुणीने तिच्या प्रियकराला सांगितली. यानंतर पेट्रोल पंपावर चांगलाच थरार रंगला. राजस्थानच्या अलवार मधील ही घटना आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
प्रेयसीसाठी प्रियकर बनला 'किलर'
पेट्रोल पंपावर रक्तरंजित थरार
Crime News : राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील बुर्जा येथील नायरा कंपनीच्या पेट्रोल पंपावर भरदिवसा सेल्समॅनवर झालेल्या गोळीबाराच्या थरारक घटनेचा पोलिसांनी छडा लावला आहे. या खळबळजनक फायरिंगमागे प्रेम प्रकरणाची पार्श्वभूमी असल्याचे पोलीस तपासात समोर आले असून, पोलिसांनी मुख्य आरोपी जगत गुर्जर याला अटक केली आहे. जखमी सेल्समॅन सचिन हा आरोपीच्या प्रेयसीला सतत फोन करून त्रास देत होता. याविषयीची माहिती जेव्हा त्या महिलेने आपला प्रेमी जगत गुर्जर याला दिली, तेव्हा त्याने संतापून सचिनला धडा शिकवण्याचा कट रचल. भरदिवसा झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. गंभीर जखमी झालेल्या सचिनला तातडीने अलवर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्याला जयपूरला पाठवण्यात आले आहे.
'असा' रचला कट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला आरोपी जगत गुर्जर हा कठूमर परिसराचा रहिवासी आहे. सचिनवर हल्ला करण्यासाठी त्याने आधी कठूमर भागातून एक दुचाकी चोरली. त्यानंतर तो अलवर येथील पेट्रोल पंपावर पोहोचला आणि त्याने तिथे काम करणाऱ्या सचिनचा गुपचूप फोटो काढला. हा फोटो त्याने आपल्या प्रेयसीला पाठवून तोच तो व्यक्ती असल्याची खात्री करून घेतली. प्रेयसीकडून ओळख पटल्यानंतर आरोपी जगत याने सचिनला फोन केला आणि त्यानंतर अत्यंत जवळून त्याच्यावर देशी कट्ट्याने गोळी झाडली. ही गोळी सचिनच्या खांद्याला लागल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.
हे ही वाचा : बाप लेकीच्या नात्याला काळिमा! वडिलांचा मुलीवर लैंगिक अत्याचार, पीडितेनं पेट्रोल टाकून घेतलं पेटवून
आठ जिवंत काडतुसे जप्त
या गुन्ह्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आणि त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेले शस्त्र तसेच आठ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. यापैकी एका काडतुसाचा वापर त्याने गोळीबारासाठी केला होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध आर्म्स ॲक्ट (शस्त्र कायदा) अंतर्गत स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे. तसेच, गोळीबारासाठी वापरलेली दुचाकी चोरीची असल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले असून, या चोरीबाबत कठूमर पोलीस ठाण्यात वेगळा गुन्हा नोंदवला जाणार आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपीने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हा कट रचून गुन्हा केला असल्याने या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला जात आहे.
हे ही वाचा : 'पूजा करा, तुमच्या मुलाला नोकरी लागेल...' नागपुरातील भोंदू बाबाचा महिलेवर बलात्कार
प्रेमप्रकरणातून वाद
आरोपी जगत गुर्जर याला पकडण्यासाठी जेव्हा पोलीस पथक गेले, तेव्हा त्याने पोलिसांशी झटापट करण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये तो स्वतः जखमी झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याला रुग्णालयात नेऊन त्याच्यावर उपचार केले आणि त्याला रीतसर अटक केली. सध्या पोलीस आरोपीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची (क्रिमिनल रेकॉर्ड) तपासणी करत असून, तो यापूर्वी इतर कोणत्याही गुन्ह्यांत सामील होता का, याचा शोध घेतला जात आहे. प्राथमिक तपासात हा संपूर्ण प्रकार प्रेम प्रकरणातून आणि एकतर्फी वादातून घडल्याचे निष्पन्न झाले असले, तरी पोलीस सर्व तथ्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.










