एसआरआय फॉर्म भरण्यासाठी गेलेल्या महिलेवर अत्याचार, चौघांनी मिळून..

मुंबई तक

Crime News : एसआरआय फॉर्म भरण्यासाठी गेलेल्या एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे. पीडितेनं पोलीस ठाणे गाठून घटनेची तक्रार दाखल केली होती. महिलेच्या या आरोपाने परिसर हादरून गेला आहे. पोलीस या प्रकरणात लक्ष घालत असून आरोपीचा शोध घेत आहेत.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

एसआरआय फॉर्म भरण्यासाठी गेलेल्या महिलेवर सामूहिक अत्याचार​​​​​​​

point

चार आरोपींच्या आवळल्या मुसक्या

Crime News : एसआरआय फॉर्म भरण्यासाठी गेलेल्या एका महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे. पीडितेनं पोलीस ठाणे गाठून घटनेची तक्रार दाखल केली होती. या महिलेच्या आरोपाने परिसर हादरून गेला आहे. पोलीस या प्रकरणात लक्ष घालत असून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. ही दुर्दैवी घटना हरियाणाच्या नूह येथील तावडू शहर पोलीस ठाणे परिसरात घडली आहे. 

हे ही वाचा : मुंबईत 9 वर्षीय मुलीवर वॉचमनचा अत्याचार, गोडाऊनमध्ये नेलं अन्..

एसआरआय फॉर्म भरण्यासाठी गेलेल्या महिलेवर सामूहिक अत्याचार

नूह येथील तावडू शहर पोलीस ठाणे परिसरात एसआरआय फॉर्म भरण्यासाठी गेलेल्या महिलेवर सामूहिक अत्याचार झाला. पीडितेनं पोलीस ठाणे गाठून घटनेची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. 

चार आरोपींच्या आवळल्या मुसक्या

पोलिसांनी या प्रकरणात चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. पीडितेनं तक्रारीत आरोपींविरोधात गंभीर आरोप लावले आहेत. तक्रार मिळताच, तावडू शहर पोलिसांनी आरोपींवर संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल केला होता. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. 

हे ही वाचा : जेजुरीत टेम्पोची वारकऱ्यांना धडक, तिघांचा मृत्यू; 3 जण जखमी

तावडू शहर ठाण्याचे प्रभारी चंद्रभार यांनी सांगितलं की, हे प्रकरण गंभीर आहे. पोलीस या प्रकरणात प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. तपासाच्या आधारावर पुढील कारवाई केली जात आहे. कोणत्याची आरोपीला मोकळं सोडलं जाणार नसल्याचं पोलिसांचं म्हणणे आहे. 

हे वाचलं का?