राहुल गांधींचा मूलांक किती?, अंकशास्रज्ञाने सांगितल्या 'या' दमदार क्वालिटीज्

मुंबई तक

Numerologist : मुंबई तक बैठकमध्ये अंकशास्त्र या विषयावर डॉ. नवनीत मानधनी यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यांच्या मुलाखतीत अंकशास्त्र, त्यातील गंमतीजंमती आणि खासकरून राजकारणाचं भवितव्यावर त्यांनी भाष्य केलं होतं. एवढंच नाही,तर त्यांनी राहुल गांधींच्या जन्म दिनांकावरून त्यांचा मूलांक आणि व्यक्तिमत्त्वाबाबतची माहिती दिली आहे. 

ADVERTISEMENT

Numerologist
Numerologist
Google CTA

बातम्या हायलाइट

point

राहुल गांधींचा मूलांक 1

point

अंकशास्त्रज्ञाने सांगितल्या काही क्वालिटीज्

Numerologist : अंकशास्त्राकडे अनेक व्यक्तींचा कल असल्याचे पाहिले आहे. मुंबई तक बैठकमध्ये अंकशास्त्र या विषयावर डॉ. नवनीत मानधनी यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यांच्या मुलाखतीत अंकशास्त्र, त्यातील गंमतीजंमती आणि खासकरून राजकारणाचं भवितव्यावर त्यांनी भाष्य केलं होतं. एवढंच नाही,तर त्यांनी राहुल गांधींची जन्मतारीख 19 असून त्यांचा मूलांक 1 असल्याचं सांगितलं. एक मूलांक असलेल्या व्यक्तींमधील गुणांबाबतची त्यांनी माहिती दिली आहे. 

हे ही वाचा : पुरोगामी कोल्हापुरात सुनेचा छळ, बारशापूर्वी आईनं गळफास घेत संपवलं जीवन

ज्योतिषशास्त्राने राहुल गांधी यांच्यातील सांगितले चांगले गुण

ज्यांची जन्मतारीख 1, 10, 19 आणि 28 आहे, अशा लोकांचा मूलांक हा एक आहे त्यांच्यात काही चांगले गुण असतात. ते चांगले अॅक्टिव्ह असतात, त्यांच्यात लीडरशीप गुण असतो, हे लोक फार महत्त्वाकांक्षी असतात. ज्यांची जन्म तारीख 1 आहे, त्यांचा कधीही अहंकार दुखवू नये. एकदा का जर अहंकार दुखावला तर त्यांच्याऐवढं वाईट कोणीच नसतं. 

'हे' चार जन्मतारखेचे लोक जगात सर्वात इमोशनल 

राहुल गांधी यांची 19 जून ही जन्मतारीख असून त्यांनी आपला जोडीदार निवडताना 8 जन्मतारीख असलेला निवडू नये, नाहीतर सर्व काही बिनसलं जाईल. तसेच ज्यांची जन्मतारीख ही 2, 11, 20 आणि 29 आहे, असे लोक जगातील सर्वात इमोशनल लोक आहेत. पौर्णिमा आणि अमावस्याला त्यांचे मुडस्विंग अधिक होतात. यांना समजून घेणाऱ्या पार्टनरची आवश्यकता असते. यांना जो समजून घेत नाही तो नंबर 9 आहे. 

हे ही वाचा : पार्थ पवारांची होणारी पत्नी कायनात दाराचं करिअर चर्चेत, कारकीर्द पाहून व्हाल थक्क!

तसेच ज्या व्यक्तींचा वाढदिवस हा 3 तारखेला असतो, अशा लोकांना आपल्या कोणत्याच गोष्टी लोकांना सांगू नये, अशी माहिती त्यांनी दिली. त्यांनी यावेळी शरद पवार यांचं देखील एक उदाहरण दिलं. ते म्हणाले की, शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचे घड्याळ नेहमी आतील बाजूसच असते. जे लोक आतल्या बाजूने घड्याळ घालतात त्यांचे प्लान कोणालाही कळत नाही.  
 

हे वाचलं का?