अंकशास्त्र आणि राजकारण्यांचं भवितव्य, पाहा ठाकरे, शिंदे आणि फडणवीसांचं पुढे काय होणार?
mumbai tak baithak dr navneet mandhani on numerology politics : मुंबई Tak बैठकीत डॉ. नवनीत मानधनी यांनी अंकशास्त्र, राजकारण आणि भविष्यविषयक अंदाजांवर सविस्तर भाष्य केले. अंकशास्त्राचा आधार घ्या, पण त्याच्या आहारी जाऊ नका, असा संदेश त्यांनी दिला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अंकशास्त्र आणि राजकारण्यांचं भवितव्य
पाहा ठाकरे, शिंदे आणि फडणवीसांचं पुढे काय होणार?
mumbai tak baithak dr navneet mandhani on numerology politics : अंकशास्त्राविषयी लोकांमध्ये वाढत चाललेली उत्सुकता, त्यामागील तर्क, राजकारणातील आकड्यांचे महत्त्व आणि भविष्यविषयक अंदाज या विषयांवर मुंबई Tak बैठकीत आयोजित विशेष सत्रात डॉ. नवनीत मानधनी यांनी सविस्तर संवाद साधला. या चर्चेत त्यांनी अंकशास्त्र, हस्ताक्षर, सही, नाव आणि त्यांचा व्यक्तीच्या आयुष्याशी असलेला संबंध यावर आपली भूमिका मांडली. तसेच अंकशास्त्र हे अंधश्रद्धा नसून अभ्यास आणि संशोधनावर आधारित विषय असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र कोणत्याही ज्योतिषशास्त्राच्या किंवा अंकशास्त्राच्या आहारी न जाता त्याचा केवळ मार्गदर्शनासाठी उपयोग करावा, असा स्पष्ट सल्लाही त्यांनी यावेळी दिला. कष्टाला पर्याय नसल्याचे सांगताना योग्य दिशेने मेहनत केल्यास अधिक चांगले परिणाम मिळू शकतात, असे ते म्हणाले. चांगला काळ असेल तर अधिक मेहनत करावी आणि प्रतिकूल काळ असेल तर स्वतःला व कुटुंबाला वेळ देऊन नुकसान कमी करण्याचा प्रयत्न करावा, असे त्यांनी नमूद केले.
हेही वाचा : पुण्याची गोष्ट: पावसामुळे कर्मचाऱ्याने रजा मागितली, मॅनेजरनं थेट नाकारली; स्क्रीनशॉट व्हायरल
भारताबाहेरील विविध देशांमध्येही या विषयावर संशोधन
या संवादादरम्यान श्रद्धा आणि अंधश्रद्धा यावरील प्रश्नालाही त्यांनी उत्तर दिले. काही विशिष्ट व्यक्तींच्या जन्मतारखा, नावांचे अंक आणि त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांचा संदर्भ देत त्यांनी अंकशास्त्रातील निरीक्षणे मांडली. एकाच दिवशी जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य वेगळे का असते, या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी प्रारब्धाबरोबरच नावाची स्पेलिंग आणि त्यातून तयार होणारे अंकही महत्त्वाची भूमिका बजावतात, असे सांगितले. जुळ्या मुलांचे उदाहरण देत जन्मवेळ, नाव आणि पालकांच्या कर्मांचा प्रभाव यावरही त्यांनी आपले मत व्यक्त केले. भारताबाहेरील विविध देशांमध्येही या विषयावर मोठ्या प्रमाणात संशोधन झाल्याचा दावा करत आपण संशोधनाच्या आधारे बोलत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुलांक आणि भाग्यांक यातील फरक समजावून सांगताना जन्मतारीख व्यक्तिमत्त्व दर्शवते, तर पूर्ण जन्मतारीखेची बेरीज व्यक्तीचा व्यवसाय, आर्थिक प्रगती आणि ओळख ठरवते, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा : Personal Finance: स्वतःचं नवं घर घेण्यासाठी 'या' फॉर्म्युल्याने ठरवा डाऊन पेमेंटचा जबरा प्लॅन










