Personal Finance: लग्नासाठी सोने खरेदी करताना लाखो रुपये कसे वाचवाल? 'या' आहेत 10 गोल्डन टिप्स!
Gold Buying Tips for Wedding : लग्नासाठी सोने खरेदी करताना योग्य नियोजन न केल्यामुळे अनेकदा ग्राहकांना सोन्याच्या किमतीपेक्षा जास्त खर्च करावा लागतो. योग्य माहिती आणि काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्यास लग्नासाठी सोने खरेदी करताना हजारो नव्हे तर लाखो रुपयांची बचत होऊ शकते.
ADVERTISEMENT

Gold Buying Tips for Wedding: मुंबई: भारतात लग्न म्हणजे सोन्याच्या दागिन्यांशिवाय कल्पनाच करता येत नाही. अनेक कुटुंबे लग्नासाठी लाखो रुपयांचे सोने खरेदी करतात. मात्र योग्य नियोजन न केल्यामुळे अनेकदा ग्राहकांना सोन्याच्या किमतीपेक्षा जास्त खर्च करावा लागतो. योग्य माहिती आणि काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्यास लग्नासाठी सोने खरेदी करताना हजारो नव्हे तर लाखो रुपयांची बचत होऊ शकते.
1. शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहू नका
लग्नाची तारीख ठरल्यावरच सोने खरेदी करण्याची चूक अनेकजण करतात. आंतरराष्ट्रीय बाजार, डॉलरचा दर आणि मागणी-पुरवठा यामुळे सोन्याचे भाव सतत बदलत असतात. त्यामुळे 6 ते 12 महिन्यांपूर्वी टप्प्याटप्प्याने सोने खरेदी केल्यास सरासरी किंमत कमी राहू शकते.
2. हॉलमार्क असलेले सोनेच खरेदी करा
नेहमी BIS Hallmark असलेले दागिनेच खरेदी करा. यामुळे सोन्याची शुद्धता निश्चित होते. भविष्यात दागिने विकताना किंवा बदलताना त्याचा फायदा होतो.
3. मेकिंग चार्जेसवर घासाघीस करा
अनेक ग्राहक फक्त सोन्याचा दर पाहतात, पण मेकिंग चार्जेसकडे दुर्लक्ष करतात. काही ठिकाणी हे चार्जेस 8% तर काही ठिकाणी 25% पर्यंत असू शकतात. त्यामुळे विविध ज्वेलर्सकडून कोटेशन घ्या आणि तुलना करा.
