Personal Finance: सोन्याचे किंमती झाल्या कमी, आता सोने खरेदी करावे की पाहावी आणखी वाट?
Gold Investment Tips: सोन्यातील गुंतवणुकीचा विचार करताना केवळ आजचा दर नव्हे, तर तुमची आर्थिक उद्दिष्टे, गुंतवणुकीचा कालावधी आणि जोखीम घेण्याची क्षमता महत्त्वाची ठरते.
ADVERTISEMENT

Personal Finance Gold Investment Tips: सोन्याच्या किमतींमध्ये गेल्या काही दिवसांपासून घसरण दिसून येत आहे. काही आठवड्यांपूर्वी विक्रमी उच्चांक गाठलेल्या सोन्याच्या दरात आता काही प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे की, आता सोने खरेदी करण्याची योग्य वेळ आहे का?
गुंतवणुकीच्या दृष्टीने पाहिल्यास, केवळ किंमत कमी झाली म्हणून मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करणे योग्य ठरत नाही. गुंतवणुकीचा निर्णय हा तुमचे आर्थिक उद्दिष्ट, गुंतवणुकीचा कालावधी आणि एकूण पोर्टफोलिओ लक्षात घेऊनच घ्यावा.
घसरणीचे कारण काय?
सोन्याच्या किमतींवर अनेक जागतिक घटकांचा परिणाम होतो. अमेरिकेतील व्याजदर, डॉलरची मजबुती, जागतिक आर्थिक परिस्थिती, महागाई आणि भू-राजकीय तणाव यामुळे सोन्याच्या किमतींमध्ये चढ-उतार होत असतात. यापैकी कोणत्याही घटकात बदल झाला की सोन्याचे दरही बदलू शकतात.
आता गुंतवणूक करावी का?
आर्थिक तज्ज्ञांच्या मते, एकरकमी मोठी गुंतवणूक करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने (Staggered Investment) सोने खरेदी करणे अधिक योग्य ठरू शकते. यामुळे बाजारातील चढ-उताराचा धोका काही प्रमाणात कमी होतो.










