मुंबईतील कोस्टल रोडच्या बोगद्यात कारला भीषण आग, Video व्हायरल

मुंबई तक

Mumbai Coastal Road Car Fire : मुंबईतील कोस्टल रोडवर बोगद्याच्या सुरूवातीलाच आग लागल्याची माहिती समोर आली. एका धावत्या चार चाकी वाहनाला आग लागली आहे. गाडीने पेट घेतल्याने धुराचे लोट पसरले आहेत. आग लागल्याने वाहतूक बंद पडलेली असल्याची माहिती समोर आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

ADVERTISEMENT

Mumbai Coastal Road Fire
Mumbai Coastal Road Fire
Google CTA

बातम्या हायलाइट

point

कोस्टल रोडवर बोगद्याच्या सुरूवातीलाच कारला आग

point

व्हिडिओ व्हायरल 

Mumbai Coastal Road Car Fire : मुंबईतील कोस्टल रोडवर बोगद्याच्या सुरूवातीलाच आग लागल्याची माहिती समोर आली. एका धावत्या चार चाकी वाहनाला आग लागली आहे. गाडीने पेट घेतल्याने धुराचे लोट पसरले आहेत. आग लागल्याने वाहतूक बंद पडलेली असल्याची माहिती समोर आली. बचावकार्य घटनास्थळी दाखल झाल्याचे सांगण्यात येते. या दुर्दैवी घटनेची माहिती 15 जुलै 2026 रोजी सकाळी घडकीस आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

हे ही वाचा : शरद पवार घड्याळ आतल्या बाजूने का घालतात? अंकशास्रज्ञाने सांगितलं लॉजिक

नरीमन पॉईंट येथून येणारी वाहतूक बंद असल्याचे सांगण्यात येते. बोगद्यातून येणारी वाहने तशीच अडकून पडलेली आहेत. यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा झालेला आहे. यामुळे घटनास्थळावरील प्रवास हा ठप्प पडला आहे. धुराच्या लोटामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. 

व्हिडिओ व्हायरल 

अशातच एका अडकलेल्या वाहनातील प्रवाशाने आमची सुखरूपपणे सुटका करावी असं सांगितलं. लोक गाड्या सोडून पळत आहेत. कृपया पोलिसांनी येण्याची कृपा करावी. आतमध्ये कोस्टल रोड जाम झाल्याचं एका प्रवाशाने व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं. 

हे ही वाचा : Astrology : श्रावण महिन्यात मोठं परिवर्तन, काही राशींचं भाग्य उजळणार

हे वाचलं का?