Astrology : श्रावण महिन्यात मोठं परिवर्तन, काही राशींचं भाग्य उजळणार
Astrology : श्रावणाच्या पवित्र महिन्यात देवगुरू बृहस्पती एक महत्त्वपूर्ण नक्षत्रात परिवर्तन करत आहे. ज्याला ज्योतिषशास्त्रात अगदीच प्रभावशाली मानले जात आहे. द्रिक पंचांगानुसार, बृहस्पती 18 जून 2026 ला पुष्य नक्षत्रात प्रवेश करत आहे. 18 ऑगस्टपर्यंत तो तिथेच वास्तव्य करेन. यानंतर 19 ऑगस्ट 2026 रोजी बुध ग्रहाच्या स्वामित्व अश्लेषा नक्षत्रात प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रानुसार, झालेल्या परिवर्तनाचा प्रभाव काही राशींच्या जीवनात बदल घडवून आणू शकतो.
ADVERTISEMENT

1/6
श्रावणाच्या पवित्र महिन्यात देवगुरू बृहस्पती एक महत्त्वपूर्ण नक्षत्रात परिवर्तन करत आहे. ज्याला ज्योतिषशास्त्रात अगदीच प्रभावशाली मानले जात आहे. द्रिक पंचांगानुसार, बृहस्पती 18 जून 2026 ला पुष्य नक्षत्रात प्रवेश करत आहे. 18 ऑगस्टपर्यंत तो तिथेच वास्तव्य करेन. यानंतर 19 ऑगस्ट 2026 रोजी बुध ग्रहाच्या स्वामित्व अश्लेषा नक्षत्रात प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रानुसार, झालेल्या परिवर्तनाचा प्रभाव काही राशींच्या जीवनात बदल घडवून आणू शकतो.

2/6
कर्क
कर्क राशीच्या लोकांसाठी हा गोचर मानसिक आणि कौटुंबीक जीवनात सकारात्मक बदल घेऊन येणारा आहे. दीर्घकाळ चाललेला तणाव आणि कौटुंबिक वाद कमी होण्याची शक्यता आहे. समाजात आदर आणि प्रतिष्ठा वाढू शकते. विवाहित सतत अडथळे आले किंवा जे योग्य जीवनसाथीच्या शोधात आहेत, त्यांना विवाहासाठी उत्तम संधी मिळण्याची शक्यता आहे.

3/6
धनु
धनु राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तुमचे काही पैसे बऱ्याच काळापासून अडकले असतील, तर परत मिळू शकतात. नोकरी आणि व्यवसायात काम करण्याची नवीन संधी निर्माण होईल. प्रॉपर्टीच्या खरेदीसाठी हा काळ अनुकूल आहे.

4/6
कन्या
कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ नक्षत्र बदल आणि करिअरच्यादृष्टीने फायदेशीर आहे. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. दिर्घकाळापासून अपूऱ्या इच्छा पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल. पदोन्नती आणि पगारवाढीच्या संधी मिळतील.

5/6
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी भाग्यवृद्धीचे संकेत आहेत. बऱ्याच काळापासून रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात चांगलं यश मिळेल.

6/6
मकर
मकर राशीच्या लोकांना विशेषत: व्यावसायिक आणि वैवाहिक जीवनात मोठा फायदा होईल. भागीदारी व्यवसायातून चांगला नफा मिळण्याची अधिक शक्यता आहे. नवीन व्यावयासिक संबंध प्रस्थापित होण्याची शक्यता आहे.










