केतन अग्रवाल हत्याकांडातील आरोपी सिया गोयलच्या कुटुंबीयांच्या कंपनीवर FDA ची मोठी कारवाई
siya goyal family company fda action pune market : केतन अग्रवाल हत्याकांडातील आरोपी सिया गोयलच्या कुटुंबीयांच्या पुण्यातील कंपनीवर एफडीएने कारवाई केली आहे. नियमांचे उल्लंघन आढळल्यानंतर 8.14 लाख रुपयांचा खाद्यसाठा जप्त करून कंपनीला व्यवसाय बंद ठेवण्याची नोटीस देण्यात आली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
केतन अग्रवाल हत्याकांडातील आरोपी सिया गोयलच्या कुटुंबीयांच्या कंपनीवर FDA ची मोठी कारवाई
8 लाख 14 हजार 630 रुपयांची खाद्यसामग्री जप्त
siya goyal family company fda action pune market : केतन अग्रवाल हत्याकांडाची चर्चा सुरू असतानाच या प्रकरणातील आरोपी सिया गोयलच्या कुटुंबीयांच्या कंपनीवर महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई केली आहे. पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात असलेल्या एम/एस बीजी गोयल अँड कंपनी या आस्थापनाची एफडीएच्या पथकाने तपासणी केली. या तपासणीत अन्न सुरक्षा नियमांचे पालन करण्यात त्रुटी आढळल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर कंपनीला पुढील आदेशापर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.
हेही वाचा : Weather Report: महाराष्ट्रात पावसाचा अचानक ब्रेक, वरूणराजा बरसणार की नाही? मान्सूनबाबत IMD चा मोठा अंदाज
8 लाख 14 हजार 630 रुपयांची खाद्यसामग्री जप्त
एफडीएच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत 'संत' आणि 'साधू' या ब्रँडअंतर्गत विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या हळद पावडरसह तीळ आणि सोयाबीन खळी यांसारख्या खाद्यपदार्थांची पाहणी करण्यात आली. तपासणीदरम्यान एकूण 4,172 किलो खाद्यसामग्री जप्त करण्यात आली असून तिची किंमत 8 लाख 14 हजार 630 रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले. लेबलिंगमधील संभाव्य त्रुटी आणि भेसळीची शक्यता लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आल्याचे एफडीएने स्पष्ट केले आहे. तसेच संबंधित खाद्यपदार्थांचे चार नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
हेही वाचा : Maharashtra Weather : ये रे ये रे पावसा.., ऐन जुलै महिन्यात पाऊस गेला कुठे? 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट










