डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरण: शिंदेंचे नगरसेवक रमेश म्हात्रेंबाबत कोर्टाचा प्रचंड मोठा निर्णय
डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना करण्यात आलेल्या मारहाण प्रकरणी मुख्य आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

डोंबिवली: शास्त्रीनगर रुग्णालयातील महिला डॉक्टर आणि नर्सिंग कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने सुनावणीदरम्यान म्हात्रे यांची आरोग्यस्थिती तसेच प्रकरणातील इतर बाबींचा विचार करून हा निर्णय दिला.
सरकारी पक्षाचा जामिनाला विरोध
सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी जामीन अर्जाला कडाडून विरोध केला. आरोपीला जामीन दिल्यास तो या प्रकरणातील साक्षीदारांवर दबाव आणू शकतो, तसेच तपासावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचा युक्तिवाद सरकारी पक्षाने न्यायालयात केला.
मात्र, बचाव पक्षाने या सर्व मुद्द्यांना प्रत्युत्तर देत आरोपी तपासात सहकार्य करत असल्याचा दावा केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने रमेश म्हात्रे यांचा जामीन अर्ज मंजूर केला.
हे ही वाचा>> ‘तो रवी उगवला नाही’ विरुद्ध ‘सूर्याकडे थुंकू नका.. ', डॉक्टर मारहाण प्रकरणावरून डोंबिवलीत नवा राजकीय राडा
इतर आरोपीही दाखल करणार जामीन अर्ज
या प्रकरणातील इतर तीन आरोपींचे जामीन अर्जही कल्याण न्यायालयात दाखल करण्यात येणार आहेत. त्यामुळे आता न्यायालय त्यांच्याबाबत काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










