'जयंत पाटील माझ्याकडेही आले होते...' एकनाथ शिंदेंचा खळबळजनक खुलासा

मुंबई तक

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्याविषयी एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी जयंत पाटील माझ्याकडेही आले होते, अशी माहिती शिंदेंनी माध्यमांशी बोलताना दिली. 

ADVERTISEMENT

Eknath Shinde On Jayant Patil
Eknath Shinde On Jayant Patil
Google CTA

बातम्या हायलाइट

point

'जयंत पाटील माझ्याकडेही आले होते...'

point

एकनाथ शिंदेंचा खळबळजनक खुलासा

Eknath Shinde On Jayant Patil : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटात सामील झालेल्या सहा खासदारांसोबत दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती आणि मतदारसंघातील विकासाच्या विविध कामांबद्दल चर्चा केल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. यावेळी त्यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावेळी जयंत पाटील माझ्याकडेही आले होते, अशी माहिती शिंदेंनी माध्यमांशी बोलताना दिली. 

'जयंत पाटील माझ्याकडे आले होते'

काल जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचीदेखील त्यांनी भेट घेतल्याची चर्चा रंगली. याविषयी विचारले असता शिंदे म्हणाले की, 'प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे आमच्या आघाडीत आहेत. महायुतीत आहेत. ते एनडीएत आहेत. जयंत पाटील माझ्याकडेही आले होते. सांगलीच्या नगरपरिषदेच्या विषयावर. आणि त्यांनी त्याचा खुलासाही केलेला आहे, की सांगलीच्या काही विषयांवर ते गेले होते. आणि मुख्यमंत्र्यांना भेटणं काही गैर आहे का? काय चुकीचं आहे का? याचा तुम्ही राजकीय अर्थ कशाला काढता?

हे ही वाचा : डिलिमिटेशनला राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पाठिंबा? सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?

'पवारसाहेबही आले होते'

शरद पवार यांच्या भेटीविषयी बोलताना ते म्हणाले की, 'पवारसाहेब पण आले होते. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातील लोकांची बैठक  होती, त्यावेळेस मुख्यमंत्री होते, मी होतो आणि शरद पवार साहेब देखील होते. त्यानंतर जाताना त्यांना त्यांच्या आमदारांची काही चर्चा करायची होती. त्यामुळं माझ्या दालनात आले होते. मला कळल्यानंतर मी आलो. आमची संस्कृती आहे. ते महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचं मी स्वागत केलं.'

हे ही वाचा :  भाजपसोबत गेल्यावर अर्थमंत्रीपद मिळणार का? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

'त्यांचा पराभव दररोज होतोय'

यापुढं बोलताना शिंदे म्हणाले की, 'आम्ही संस्कृती जपतो, पण काही लोकांना विकृती झालेली आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये विकृत भाष्य करायचं. ज्या शरद पवारांचं तुम्ही खाता, ज्या शरद पवारांचं तुम्ही गुणगान गाता त्यांच्याविरोधातच तुम्ही भूमिका घेता. ही कुठली महाविकासआघाडी? ते पार गोंधळलेले आहेत. एकदम बिथरलेले आहेत. ते काय बोलतात हे त्यांना कळत नाही. त्यांचा पराभव दररोज होतोय.'
 

हे वाचलं का?