बागेश्वर बाबांच्या भावाचं कांड, शेतकऱ्याने केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

मुंबई तक

मध्य प्रदेशातील छतरपूर येथील बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे धाकटे बंधू शालिग्राम गर्ग यांच्या विरोधात पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. यामागे नेमके काय कारण आहे, जाणून घ्या सविस्तर.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

बागेश्वर बाबांच्या भावाचं कांड

point

शेतकऱ्याने केले गंभीर आरोप

point

नेमकं प्रकरण काय?

Crime News : मध्य प्रदेशातील छतरपुर येथे बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या भावावर मारहाण आणि गोळीबार केल्याचे गंभीर आरोप झाले आहेत. पोलिसांनी धीरेंद्र शास्त्री यांचे भाऊ शालिग्राम गर्ग यांच्याविरुद्ध गुन्हा (एफआयआर) दाखल केला आहे. या तक्रारीत एका शेतकऱ्याला मारहाण करणे, हवेत गोळीबार करणे आणि जमिनीच्या वादातून जीवे मारण्याची धमकी देणे यासारख्या आरोपांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

हवेत तीन राऊंड फायर

ही घटना 14 जुलै रोजी छतरपुर जिल्ह्यातील राजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोंडा गावात घडल्याचे पोलिसांनी सांगितले. गावात राहणारे मोतीलाल यांनी आरोप केला आहे की, ते आपल्या सहकाऱ्यांसह गावात उपस्थित असताना शालिग्राम गर्ग आपले साथीदार सतीश, आशिष आणि अन्य एका व्यक्तीसह तेथे पोहोचले. यानंतर दोन्ही गटात सुरुवातीला शिवीगाळ झाली आणि नंतर काठ्यांनी मारहाण करण्यात आली. या वादादरम्यान आरोपींनी तीन राऊंड हवेत गोळीबार केल्याचा दावाही तक्रारीत करण्यात आला आहे. या मारहाणीत मोतीलाल जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हे ही वाचा : शरद पवार घड्याळ आतल्या बाजूने का घालतात? अंकशास्रज्ञाने सांगितलं लॉजिक

चार जणांवर गुन्हा दाखल

या घटनेचे काही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या व्हिडिओंमध्ये काही लोकांमध्ये वाद आणि झटापट होताना स्पष्ट दिसत आहे. पोलिसांनी या व्हायरल व्हिडिओची दखल घेतली असून हा व्हिडिओ तपासाचा एक भाग असल्याचे स्पष्ट केले आहे. छतरपुरचे पोलीस अधीक्षक (एसपी) रजत सकलेचा यांनी सांगितले की, तक्रार मिळाल्यानंतर शालिग्राम गर्ग यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सर्व बाजूंचे जबाब नोंदवत आहेत. तसेच व्हायरल व्हिडिओसह इतर पुराव्यांची सखोल तपासणी केली जात असून, तपासात समोर येणाऱ्या तथ्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.

हे ही वाचा : 'किती वेळा सांगितलं, नवऱ्यापासून लांब रहा...' नणंदेनं वहिणीला संपवलं

यापूर्वीही अनेक वाद

हा संपूर्ण वाद जुन्या जमिनीच्या कारणावरून झाल्याचे सांगितले जात आहे. याच वादातून मारहाण आणि गोळीबाराची घटना घडल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. मात्र, पोलीस प्रशासनाने सध्या तपास सुरू असल्याचे सांगत, वादाचे मुख्य कारण तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल असे म्हटले आहे. शालिग्राम गर्ग यांचे नाव यापूर्वीही विविध वादात समोर आले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून गावात शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हे वाचलं का?