'किती वेळा सांगितलं, नवऱ्यापासून लांब रहा...' नणंदेनं वहिणीला संपवलं

मुंबई तक

दोन दिवसांपूर्वी मेरठमध्ये घडलेल्या निदाच्या हत्येचा छडा पोलिसांनी लावला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मृत निदाच्या नणंदेने, तिचा नवरा आणि निदा यांच्यात कथित जवळीक असल्याचा संशय आल्याने, तिच्यावर स्वयंपाकघरातील चाकूने हल्ला करून तिची हत्या केली.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

किती वेळा सांगितलं, नवऱ्यापासून लांब रहा...

point

नणंदेनं वहिणीला संपवलं

Crime News : तीन दिवसांपूर्वी झालेल्या एका भयानक हत्याकांडाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणाचा वेगाने तपास करत पोलिसांनी मृत महिलेच्या नणंदेलाच हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे. पोलिसांनी आरोपी महिलेकडून हत्येसाठी वापरलेला चाकू देखील जप्त केला आहे. 12 जुलै रोजी निदा नावाच्या महिलेची घरातच चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली होती. मंगळवारी या प्रकरणाचा खुलासा करत पोलिसांनी मृत निदाची नणंद रिमशा हिला ताब्यात घेऊन अटक केली. उत्तर प्रदेशातील मेरठमधील ही घटना आहे.

अनैतिक संबंधांमुळे वाद

पोलिसांच्या प्राथमिक तपासात या हत्येमागील धक्कादायक कारण समोर आले आहे. मृत निदा आणि आरोपी रिमशाचा पती उवैश यांच्यात गेल्या काही काळापासून जवळचे संबंध होते. या अनैतिक संबंधांमुळे त्यांच्या कुटुंबात सातत्याने वाद होत असत. नणंद रिमशाला या संबंधांची माहिती मिळाल्यापासून ती निदावर प्रचंड संतप्त होती. याच वादाचा राग मनात धरून रविवारी, 12 जुलै रोजी रिमशाने निदावर स्वयंपाकघरातील भाजी कापण्याच्या चाकूने वार केले, ज्यामध्ये निदाचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी रिमशाला अटक करून न्यायालयात हजर केले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

हे ही वाचा : Personal Finance: सोन्याचे किंमती झाल्या कमी, आता सोने खरेदी करावे की पाहावी आणखी वाट?

माहेरी आली अन् गेला जीव

या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा करताना पोलिसांनी सांगितले की, 12 जुलै रोजी निदाच्या हत्येची घटना उघडकीस आली होती, ज्यावर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला होता. पोलीस तपास आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांना रिमशावर संशय आला. घटनेच्या दिवशी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास रिमशा आपल्या माहेरी आली होती. तिथे तिचे निदासोबत याच कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. या वादादरम्यान संतापलेल्या रिमशाने किचनमधील चाकू उचलला आणि थेट निदाच्या छातीत वार केला, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला.

हे ही वाचा : शरद पवार घड्याळ आतल्या बाजूने का घालतात? अंकशास्रज्ञाने सांगितलं लॉजिक

आणखी कोणाचा सहभाग?

पोलिसांनी आरोपी रिमशाची सखोल चौकशी केली असता तिने आपला गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी आरोपीच्या सांगण्यावरून हत्येसाठी वापरलेला चाकूही जप्त केला आहे. या संपूर्ण घटनेमध्ये आणखी कोणाचा सहभाग होता का आणि त्यांची या गुन्ह्यात काय भूमिका होती, याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

हे वाचलं का?