बायको बॉयफ्रेंडसोबत दिसली, अंगावर काटा आणणारा मर्डर, नवऱ्याला क्रूरपणे संपवलं
gujarat crime news : गुजरातच्या बनासकांठामध्ये विवाहबाह्य संबंधातून पत्नीने प्रियकर आणि त्याच्या साथीदारासह पतीची हत्या केल्याचा आरोप. या प्रकरणात पत्नीसह तिघांना अटक करण्यात आली असून नऊ मुलांवर मोठे संकट कोसळले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बायको बॉयफ्रेंडसोबत दिसली
अंगावर काटा आणणारा मर्डर, नवऱ्याला क्रूरपणे संपवलं
Crime News : विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून एका महिलेने तिच्या प्रियकर आणि त्याच्या साथीदाराच्या मदतीने स्वतःच्या पतीची हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा उलगडा करत पोलिसांनी मृत व्यक्तीची पत्नी आणि तिच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणातील सर्वात वेदनादायक बाब म्हणजे मृत दाम्पत्याला एकूण नऊ मुले आहेत. त्यामध्ये आठ मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. चार मुलींचे विवाह झाले असून चार लहान मुली आणि एक लहान मुलगा आता आई-वडील दोघांच्याही आधारापासून वंचित झाले आहेत. वडिलांचा मृत्यू झाला असून आई हत्या प्रकरणात तुरुंगात गेल्याने या मुलांचे भवितव्यही अनिश्चित झाले आहे.
हेही वाचा : बायकोनं गरीब नवऱ्याच्या डोक्यात मोबाईल घातला, कोच पडून भळाभळा रक्त, अखेर दुर्दैवी अंत
मृत्यू नैसर्गिक वाढला, पण पुढे हत्या झाल्याचे उघड
माहितीनुसार, गणेशपुरा गावातील गमाभाई ठाकोर हे गेल्या चार वर्षांपासून कुटुंबासह शेतमजुरी करून उदरनिर्वाह करत होते. 8 जुलै रोजी त्यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि थराद पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सुरुवातीला हा मृत्यू नैसर्गिक असल्याचे वाटत होते. मात्र, शवविच्छेदन अहवालात हा मृत्यू हत्या असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. तपासादरम्यान गमाभाई यांची पत्नी नर्मदा उर्फ नबाबेन हिचे गावातील प्रेमजी पटेल याच्यासोबत विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी या दृष्टीने तपास सुरू केला.
हेही वाचा : 'कायदा सर्वांना समान', चुकीच्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींना तुकाराम मुंढेंचा इशारा










