घरातल्या टीव्हीचा आवाज 100 पर्यंत वाढवला, नवऱ्याने उर्मिलासोबत काय केलं?
MP Crime News : इंदूरमधील उर्मिला सैनी हत्याकांडात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पोलिस तपास आणि मुलीच्या जबाबातून हत्या पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचे समोर आले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
घरातल्या टीव्हीचा आवाज 100 पर्यंत वाढवला
नवऱ्याने उर्मिलासोबत काय केलं?
MP Crime News : मध्य प्रदेशातील इंदूर येथे 38 वर्षीय पोस्टल असिस्टंट उर्मिला सैनी यांच्या हत्याप्रकरणात दररोज नवे आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पोलिस तपास तसेच मृत महिलेची मुलगी प्रेक्षा हिने दिलेल्या जबाबातून ही हत्या रागाच्या भरात झालेली नसून पूर्णपणे नियोजनबद्ध कटाचा भाग असल्याचे स्पष्ट होत आहे. आरोपी पती अखिलेश सैनी याने हत्येपूर्वी प्रत्येक गोष्टीचे बारकाईने नियोजन केले होते, जेणेकरून आपल्या कृत्याचा कोणालाही संशय येऊ नये. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीने गुन्हा करण्यापूर्वी आणि त्यानंतरची प्रत्येक हालचाल आधीच ठरवून ठेवली होती.
हेही वाचा : बायकोनं गरीब नवऱ्याच्या डोक्यात मोबाईल घातला, कोच पडून भळाभळा रक्त, अखेर दुर्दैवी अंत
आरोपीच्या चेहऱ्यावर कोणताही तणाव नव्हता
पोलिस तपासात समोर आले आहे की, पत्नीची हत्या केल्यानंतरही आरोपीच्या चेहऱ्यावर कोणताही तणाव नव्हता. त्याने रक्ताने माखलेले कपडे घराजवळील एका चेंबरमध्ये फेकून दिले. त्यानंतर आंघोळ करून स्वच्छ कपडे घातले, केसांना तेल लावले आणि कपाळावर टिळा लावून तो थेट आपल्या मुलगी प्रेक्षा आणि मुलगा अव्यक्त यांच्या शाळेत पोहोचला. तेथे त्याने मुलीकडे आईचा नेकलेस, घराची चावी आणि एटीएम कार्ड दिले. तसेच शाळा सुटल्यानंतर मावशीच्या घरी जाण्यास सांगितले आणि त्यानंतर तेथून फरार झाला. या संपूर्ण घटनाक्रमामुळे आरोपीने गुन्ह्यानंतरही स्वतःवर कोणताही संशय येऊ नये, यासाठी नियोजन केल्याचे समोर येत आहे.
हेही वाचा : 'कायदा सर्वांना समान', चुकीच्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींना तुकाराम मुंढेंचा इशारा










