सोनम वांगचुक यांना पोलिसांनी उचललं, मला मारहाण झाली; दिपकेंचे आरोप अन् पोलिसांचं स्पष्टीकरण

मुंबई तक

sonam wangchuk : जंतर-मंतरवरील उपोषणादरम्यान सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात हलवले. त्यानंतर आंदोलकांना हटवण्याची कारवाई सुरू झाली असून अभिजीत दिपके यांनी पोलिसांकडून मारहाण झाल्याचा आणि अडवून ठेवल्याचा आरोप केला.

ADVERTISEMENT

sonam wangchuk
sonam wangchuk
Google CTA

बातम्या हायलाइट

point

सोनम वांगचुक यांना पोलिसांनी उचललं, मला मारहाण झाली

point

दिपकेंचे आरोप अन् पोलिसांचं स्पष्टीकरण

sonam wangchuk : दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान उपोषणकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात हलवले. यानंतर आंदोलनस्थळावरील आंदोलकांना हटवण्याची कारवाई सुरू करण्यात आली. दरम्यान, अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ संदेश जारी करत दिल्ली पोलिसांनी आपल्याला मारहाण करून ताब्यात ठेवल्याचा आरोप केला आहे. त्यांनी सांगितले की, "दिल्ली पोलिसांनी सोनम सरांना उचलून नेले. येथे आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. मी मित्राच्या घरी गेल्यानंतर पोलिसांनी मला मारहाण करून अडवून ठेवले. आता आम्हाला जंतर-मंतरला जाऊ दिले जात नाही." तसेच त्यांनी देशभरातील नागरिकांना आपल्या-आपल्या भागात शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन केले.

हेही वाचा : समजून घ्या: डीलिमिटेशनमध्ये मतदारसंघ असे काही बदलले की काँग्रेसचा विश्वासच राहिला नाही?

दिल्ली पोलिसांनी X वरुन मांडली भूमिका 

या संपूर्ण प्रकरणावर दिल्ली पोलिसांनी अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. पोलिसांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावत असल्याने त्यांना आवश्यक वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करताना काही आंदोलकांनी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ किरकोळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र पोलिसांनी संयम राखत संपूर्ण प्रक्रिया सुरक्षितपणे पार पाडली. तसेच जंतर-मंतरवरील आंदोलकांनी शांततेने आंदोलनस्थळ रिकामे करण्याचे आवाहनही करण्यात आले.

हेही वाचा : "डर्टी संजय राऊत, संघभूमीवर नाक रगडून..", नितेश राणेंनी थेट पत्र लिहिलं, नेमकं काय घडलं?

हे वाचलं का?