अजितदादांच्या विमान अपघाताप्रकरणी AAIB चा महत्त्वाचा अहवाल आला समोर, नेमकं काय घडलं?

मुंबई तक

Ajit pawar Black box : राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनाला आज (28 फेब्रुवारी) रोजी एक महिना पूर्ण झाला होता. आजच्याच दिवशी अजित पवार यांच्या अपघाताप्रकरणी AAIB चा अहवाल समोर आला आहे.  याच अहवालात अजितदादांच्या ब्लॅक बॉक्सबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

ADVERTISEMENT

Ajit pawar Black box
Ajit pawar Black box
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अजितदादांच्या अपघाताबाबत अहवालातून धक्कादायक माहिती

point

अहवालातून संभाव्य कारणे

Ajit pawar Black box : राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या निधनाला आज (28 फेब्रुवारी) रोजी एक महिना पूर्ण झाला. आजच्याच दिवशी अजित पवार यांच्या अपघाताबाबतचा महत्त्वाचा अहवाल समोर आला आहे.  AAIB  या अहवालातून अजितदादांच्या अपघाताप्रकरणी ब्लॅक बॉक्सबाबतची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

हे ही वाचा : तरुणीचा मानसिक छळ, तीन पुरुष सतत करत होते ब्लॅकमेल, पंख्याला गळफास घेत संपवलं जीवन

अजितदादांच्या अपघाताबाबत अहवालातून धक्कादायक माहिती

अहवालानुसार, अपघातादरम्यान विमान आगोदर एका झाडावर आदळले, नंतर तेच विमान जमिनीवर कोसळल्याचं सांगितलं. त्यानंतरच विमानाचा मोठा स्फोट होऊन अपघात झाला होता. या स्फोटामुळे ब्लॅक बॉक्स जळाल्याची माहिती अहवालात नमूद केली आहे. हाच अहवाल 22 पानांचा आहे.  

हे ही वाचा : गडचिरोलीत बँकेची संवेदनशून्यता, कोमातील वृद्धेला न्यावे लागले थेट बँकेत; शाखा व्यवस्थापकाचा आडमुठेपणा

अपघाताची काही संभाव्य कारणे

दरम्यान अजितदादांच्या विमान अपघाताची काही संभाव्य कारणे सांगितलेली आहेत. ज्यात कमी दृश्यमानता, अनकंट्रोल्ड एअरफिल्डची अपुरी असलेली पायाभूत सुविधा, टेबल-टॉप रनवे तसेच MET माहितीची मर्यादित अचूकता अशी इतर काही संभाव्य कारणे आहेत. 

बारामती दौऱ्यावर येताना अपघात झाला

अजितदादा हे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत प्रचारसभेसाठी गेले होते. याचदरम्यान, ही दुर्दैवी घटना घडली आहे. अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्र पोरका झाला. या दुर्घटनेचा तपास सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp