तरुणीचा मानसिक छळ, तीन पुरुष सतत करत होते ब्लॅकमेल, पंख्याला गळफास घेत संपवलं जीवन

मुंबई तक

Suicide News : एका तरुणीने आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं. या प्रकरणी कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तरुणीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र, सुरुवातीला पोलीस तपासात अद्याप ब्लॅकमेलिंगच्या आरोपांची पुष्टी झालेली नाही. 

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महिलेला तीन पुरुष सतत ब्लॅकमेल करायचे

point

तरुणीने छताच्या पंख्याला गळफास घेत संपवलं जीवन

Suicide News : नोएडात फेज 3 मध्ये पोलीस ठाणे परिसरात एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुणीने आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं. या प्रकरणी कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तरुणीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र, सुरुवातीला पोलीस तपासात अद्याप ब्लॅकमेलिंगच्या आरोपांची पुष्टी करण्यात आलेली नाही. 

हे ही वाचा : महिलेने रागाच्या भरात लिव्ह इन पार्टरनला ड्रग्ज देऊन त्याचे गुप्तांग कापले, नंतर घटनास्थळावरून काढला पळ

महिलेला तीन पुरुष सतत ब्लॅकमेल करायचे

कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, मृत महिलेला तीन पुरुष सतत ब्लॅकमेल करत होते. त्यांनी तिचा मानसिक छळ करत तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे उकळले. कुटुंबाचा दावा आहे की, त्यांनी आरोपींनी पाठवलेले व्हॉट्सअॅप चॅट्स आणि व्हिडिओ पुरावा म्हणून पोलिसांकडे सादर केले. 

तरुणीने छताच्या पंख्याला गळफास घेत संपवलं जीवन

21 फेब्रुवारी 2026 रोजी, तरुणीने तिच्या घरातच छताच्या पंख्याला गळफास घेत जीवन संपवलं. घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणात आरोपीने मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. अंत्यसंस्कारानंतर 27 फेब्रुवारी रोजी कुटुंबाने फेज 3 पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

हे ही वाचा : चेंबूरमध्ये इमारतीचं बांधकाम सुरु असताना सहाव्या मजल्यावरून सहा कामगार कोसळले, एकाचा करुण अंत

या प्रकरणात कारवाई करत पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली. इतर दोघांचा शोध देखील घेण्यात आला. दरम्यान, एडीसीपी सेंट्रल नोएडा आरके गौतम म्हणतात की, आतापर्यंतच्या तपासात ब्लॅकमेलिंगचे कोणतेही ठोस पुरावे आढळून आलेले नाहीत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp