चेंबूरमध्ये इमारतीचं बांधकाम सुरु असताना सहाव्या मजल्यावरून सहा कामगार कोसळले, एकाचा करुण अंत
Mumbai News : मुंबईतील चेंबूर परिसरात शनिवारी बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत मोठी दुर्घटना घडली होती. सुभाषनगर येथील इमारत क्रमांक 36 च्या सहाव्या मजल्यावरून पार्किंग लिफ्टची भिंत बांधताना सहा कामगार पडले. या दुर्दैवी अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले होते.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
चेंबूरमध्ये बांधकाम सुरु असताना सहाव्या मजल्यावरून कामगार पडले
एकाचा मृत्यू तर सहाजण गंभीर जखमी

हे ही वाचा : महिलेने रागाच्या भरात लिव्ह इन पार्टरनला ड्रग्ज देऊन त्याचे गुप्तांग कापले, नंतर घटनास्थळावरून काढला पळ
चेंबूरमध्ये बांधकाम सुरु असताना सहाव्या मजल्यावरून कामगार पडले
घडलेल्या घटनेनुसार, सकाळी 9:45 ते 10 वाजताच्या दरम्यान अपघात झाला. चेंबूरमध्ये सुभाषनगर इमारत क्रमांक 36 मध्ये पार्किंगमध्ये भिंतीचे बांधकाम सुरु होते, तेव्हा सुरक्षा संरचनेत बिघाड झाल्याने सहाव्या मजल्यावरून सहा कामगार पडले. त्यापैकी एकाचा मृत्यू होऊन सहाजण गंभीर जखमी झाले आहेत.
एकाचा मृत्यू तर सहाजण गंभीर जखमी
अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ निर्माण झाला. स्थानिक रहिवासी आणि घटनास्थळी उपस्थितांनी कामगारांच्या मदतीने सर्व जखमींना तात्काळ राजावाडी रुग्णालायत नेण्यात आले होते. तपासणीनंतर डॉक्टरांनी एका कामगाराला मृत असल्याचे घोषित केले. संबंधित प्रकरणात पाच जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हे ही वाचा : 23 वर्षीय तरुणीवर एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार... नंतर, चौथ्या मजल्यावरून खाली पाडून निर्दयी हत्या!
या प्रकरणातील तपासात डॉक्टरांनी एका कामगाराला मृत घोषित केले. इतर पाच कामगारांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत, त्यापैकी काहींची प्रकृती ही चिंताजनक असल्याची माहिती समोर आली.