Dhananjay munde : धनंजय मुंडेंना क्लीन चीट, अंजली दमानियांचे आरोप लोकायुक्तांनी फेटाळले!
Dhananjay munde : हे प्रकरण धनंजय मुंडे कृषी मंत्री असतानाच्या काळातील आहे. कापूस, सोयाबीन आणि तेलबियांची उत्पादकता वाढवण्याच्या एका योजनेअंतर्गत नॅनो फर्टिलायझर, कॉटन बॅग आणि बॅटरीवर चालणाऱ्या स्प्रे पंपांची खरेदी करण्यात आली होती. या वस्तूंच्या खरेदीत करोडो रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
Dhananjay munde : धनंजय मुंडेंना क्लीन चीट
अंजली दमानियांचे आरोप लोकायुक्तांनी फेटाळले!
मुंबई : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना राज्याच्या लोकायुक्तांनी मोठा दिलासा दिला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंडे यांच्यावर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप लोकायुक्तांनी फेटाळून लावले आहेत. यामध्ये कृषी साहित्याच्या खरेदीत झालेली कथित अनियमितता आणि Office of Profit यांसारख्या आरोपांचा समावेश होता.
नेमके प्रकरण काय?
हे प्रकरण धनंजय मुंडे कृषी मंत्री असतानाच्या काळातील आहे. कापूस, सोयाबीन आणि तेलबियांची उत्पादकता वाढवण्याच्या एका योजनेअंतर्गत नॅनो फर्टिलायझर, कॉटन बॅग आणि बॅटरीवर चालणाऱ्या स्प्रे पंपांची खरेदी करण्यात आली होती. या वस्तूंच्या खरेदीत करोडो रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता.
हेही वाचा : 13 वर्षाच्या मुलाने 10 वर्षाच्या मुलीला मक्याच्या शेतात नेत केले अत्याचार, नंतर गळा चिरून संपवलं
हायकोर्टाच्या निकालाचा संदर्भ
लोकायुक्तांपूर्वी बॉम्बे हायकोर्टानेही याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्या बाजूने निकाल दिला होता. हे आरोप कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय लावण्यात आले असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले होते. हायकोर्टाने केवळ या याचिका फेटाळल्या नव्हत्या, तर याचिकाकर्त्यांना 1 लाख रुपयांचा दंडही ठोठावला होता. या निकालावर कोणतीही अपील दाखल करण्यात आली नाही आणि दंडही भरण्यात आला. "आम्ही हायकोर्टाच्या या निर्णयाचा सन्मान करतो," असे लोकायुक्तांनी आपले मत नोंदवताना म्हटले.










