Maharashtra Weather : राज्यात पावसाचा वेग संथ, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्टचा अंदाज
Maharashtra weather : राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मान्सून दाखल होण्याची दाट शक्यता आहे, अशातच जाणून घ्या एकूण हवामान विभागाचा अंदाज.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज्यात पावसाची गती संथ
जाणून घ्या एकूण हवामान विभागाचा अंदाज
Maharashtra Weather : राज्यात मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे, तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या राज्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे, तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मान्सून दाखल होण्याची दाट शक्यता आहे, अशातच जाणून घ्या एकूण हवामान विभागाचा अंदाज.
हे ही वाचा : गडचिरोली: प्रसूतीच्या कळा सोसत होती आई, डॉक्टर नसल्याने माय लेकराचा अंत
कोकण
कोकण विभागातील पालघर, ठाण आणि मुंबई येथे हलका ते मध्यम स्वरुपाची शक्यता वर्तविण्यात आलीये. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांत मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. नंदुरबार, नाशिक आणि जळगाव या तीन जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. नाशिक घाटमाथा परिसरात मध्यम स्वरुपाचा अंदाज आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलाय. साताऱ्यात हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. पुणे, घाटमाथा, कोल्हापर घाटमाथा आणि सातारा घाटमाथा परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा यलो अलर्ट आहे.
