नांदेड हादरलं! चॉकलेटचं आमिष दाखवत तीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार
Nanded Crime News : नांदेडच्या लोहा येथून लाज आणणारा प्रकार उघडकीस आलेला आहे. काकाने चॉकलेटचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार केल्याची मन सुन्न करून टाकणारी घटना आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
चॉकलेटचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार
आरोपीवर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
Nanded Crime News : कुवरचंद मंडले - नांदेडच्या लोहा येथून लाज आणणारा प्रकार उघडकीस आलेला आहे. काकाने चॉकलेटचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार केल्याची मन सुन्न करून टाकणारी घटना आहे. या प्रकरणी पीडितेच्या आईने पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी 25 ऑगस्ट रोजी मंगळवारी पहाटे गुन्हा दाखल केला. नंतर आरोपीचा कसून शोध सुरू करण्यात आला.
हे ही वाचा : पालघरच्या आश्रमशाळेत सात वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, 26 विद्यार्थांना ताप, खोकला अन् सर्दी
अंगणात खेळताना चिमुकलीसोबत गैरकृत्य
घडलेल्या घटनेनुसार, सोमवारी 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी पीडित चिमुकली घरासमोरील अंगणात खेळत होती. त्याच वेळी शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांनी तिला चॉकलेटचं आमिष दाखवून तिला सोबत नेले होते. साधारण 20 ते 25 मिनिटांनंतर तो मुलीला पुन्हा घरी सोडून निघून गेला. मुलगी रडत असल्याचे तिच्या आईच्या लक्षात आले. या प्रकरणाची कसून चौकशी केली असता, संबंधित व्यक्तीने तिच्यासोबत गैरकृत्य केल्याची माहिती दिली.
पीडितेची प्रकृती स्थिर
चिमुकली कथितरित्या आरोपीला बाबा अशी बाक मारायची. मुलीला दुखापत झाल्याचे निदर्शनास येताच पालकांनी तिला तातडीने नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर डॉक्टरांच्या देखदेखीखाली उपचार सुरू करण्यात आले असून तिची सध्या प्रकृती स्थिर आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी घटनास्तळी धाव घेत पंचनामा केला.
हे ही वाचा : पीडितेला जंगलात नेत जिप्सीला बांधून केले अत्याचार, घरी परतल्यानंतर सांगितला घटनाक्रम
आरोपीवर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
दरम्यान, पीडितेच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास संशयिताविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर आरोपी फरारा झाला असून पोलीस या प्रकरणाचा शोध घेत आहे. या घटनेचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या अमानुष कृत्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
