तरुणाकडून प्रेयसीच्या पाच वर्षाच्या मुलाचं अपहरण, जंगलात नेत प्रायव्हेट पार्टवर केले वार
Crime News : तरुणाने आपल्या प्रेयसीच्या पाच वर्षाच्या मुलाचे अपहण केले. त्याला एका निर्जनस्थळी नेत त्याच्या प्रायव्हेट पार्टवर आणि नाकावर वार केले. घटनेच्या अवघ्या 24 तासांत पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळून न्यायालयात हजर करण्यात आले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
महिलेच्या प्रियकरानं तिच्या मुलाचं अपहण केलं
शेतात नेत प्रायव्हेट पार्ट आणि नाकावर केले वार
Crime News : उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील डिडौली परिसरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तरुणाने आपल्या प्रेयसीच्या पाच वर्षाच्या मुलाचे अपहण केले. त्याला एका निर्जनस्थळी नेत त्याच्या प्रायव्हेट पार्टवर आणि नाकावर वार केले. घटनेच्या अवघ्या 24 तासांत पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळून न्यायालयात हजर करण्यात आले. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. आरोपीची ओळख शान पाशा अशी समोर आली असून पोलीस चकमकूत त्याला ठार करण्यात आले.
हे ही वाचा : 30 वर्षीय बहिणीवर दोन भावांकडून सामूहिक बलात्कार, धक्कादायक कारण समोर
महिलेच्या प्रियकरानं तिच्या मुलाचं अपहण केलं
आरोपीच्या ताब्यातून पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्यात आले. संबंधित पीडित जखमी मुलावर उपचार सुरू असून प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात येतेय. या प्रकरणी एसपी लखन सिंह यादव यांनी सांगितलं की, गुरूवारी रात्रीच्या सुमारास आरोपी शान पाशाने दिडोली कोतवाली परिसरात एका गावात घरात झोपलेल्या पाच वर्षाच्या मुलाचे अपहरण करण्यात आले होते.
शेतात नेत प्रायव्हेट पार्ट आणि नाकावर केले वार
संबंधित मुलाला आरोपी पाशा हा संभल जिल्ह्यातील ढफ्तोरा गावातील जंगलात घेऊन गेला होता, तिथे त्याच्या प्हायव्हेट पार्टवर आणि नाकावर धारदार शस्त्राने हल्ला केला, जिथे त्याने नाकावर आणि गुप्तांगावर अनेकदा वार केले. पीडिताचा मृत्यू झाल्याच्या समजतीतून त्याने घटनास्थळावरून पळ काढला. अशातच महिला जागी झाली असता, तिला कळलं की, आपला मुलगा हा गायब झाला आहे.
हे ही वाचा : पुण्याच्या तळेगाव दाभाडे परिसरात रस्ता फोडून उसळला पाण्याचा फवारा, Video व्हायरल
महिलेनं मुलाचा तब्बल दोन तास शोध घेतला होता. तेव्हा तिला आपला मुलगा एका शेतात गंभीरपणे जखमी अवस्थेत आढळून आला होता. या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. एशातच एसपी लखन यांनी घटनास्थळी पाहणी करून आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी तीन पथके तयार केली. पीडित मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस तपासातून असे उघडकीस आले की, संबंधित महिलेचा काही दिवसांपूर्वी पतीचे निधन झाले होते. महिला शान पाशाच्या प्रेमात होती.










